२० मे रोजी देशभरात मेडिकल सेवा बंद! कारण काय, केमिस्ट-ड्रगिस्ट असोसिएशनच्या मागण्या नेमक्या काय?

ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्सने २० मे २०२६ रोजी देशभरातील सुमारे १२.४० लाख केमिस्ट दुकाने आणि ड्रग डिस्ट्रीब्यूटर्स बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ई-फार्मसी, (country) म्हणजेच ऑनलाइन औषध विक्री, मोठ्या प्रमाणातील डिस्काउंट आणि अपुऱ्या नियमनाच्या मुद्द्यावर हा एकदिवसीय बंद पुकारण्यात आला आहे. महाराष्ट्रासह गुजरात, दिल्ली, उत्तर प्रदेश, आसाम, गोवा, नागालँडसह अनेक राज्यांमध्ये या बंदचा मोठा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे.

ई-फार्मसी प्लॅटफॉर्म्स नियमितपणे काम करत असून, त्यांच्याकडून प्रिस्क्रिप्शनची योग्य तपासणी होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. एआय-जनरेटेड बनावट प्रिस्क्रिप्शन्स, रिपीट प्रिस्क्रिप्शन्स वापरून अँटिबायोटिक्स, ऑपिऑइड्स, सवयी लावणारी औषधे आणि बंदी असलेली औषधेही विकली जात असल्याचा दावा केला जात आहे. ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर ग्राहकांना मोठ्या प्रमाणात पर्यायी औषधे दाखवली जातात.(country) तसेच एक्सपायरी जवळ आलेली औषधेही विकली जात असल्याचा आरोप आहे. यामुळे अँटिमायक्रोबियल रेझिस्टन्स वाढण्याचा धोका, रुग्णांच्या सुरक्षिततेला धोका आणि बनावट औषधांचा प्रसार होऊ शकतो, अशी माहिती फार्मासिस्ट वैभव उमाळे, श्री मेडिकल, मलकापूर यांनी दिली आहे.

कोविड काळातील तात्पुरते नियम, म्हणजेच G.S.R. २२०(E) आणि G.S.R. ८१७(E), अजूनही सुरू ठेवल्याने ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सना फायदा होत आहे, तर पारंपरिक केमिस्टना तोटा सहन करावा लागत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या डीप डिस्काउंटिंगमुळे छोट्या आणि ग्रामीण भागातील केमिस्ट दुकानांचा व्यवसाय बंद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे सुमारे ५ कोटी लोकांच्या उपजीविकेवर परिणाम होईल, असा दावा AIOCD ने केला आहे.

केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनच्या मुख्य मागण्या ई-फार्मेसीशी संबंधित G.S.R. २२०(E) आणि G.S.R. ८१७(E) नोटिफिकेशन्स त्वरित रद्द कराव्यात.ऑनलाइन औषध विक्रीवर कठोर नियमन करावे किंवा सर्वांसाठी समान नियम लागू करावेत.डीप डिस्काउंटिंग थांबवून समान व्यापार संधी निर्माण करावी.प्रिस्क्रिप्शनची कडक तपासणी करावी आणि नॉन-फार्मासिस्ट मालकांना दुकाने चालवण्यास प्रतिबंध करावा.फार्मसी मार्जिन रेशनलाइझ करून छोट्या केमिस्टना संरक्षण द्यावे.

२० मे रोजी बहुतेक रिटेल आणि होलसेल मेडिकल स्टोअर्स बंद राहण्याची शक्यता आहे.
आपत्कालीन आणि क्रिटिकल केअरसाठी काही सरकारी किंवा खासगी रुग्णालयांमधील फार्मसी सुरू राहू शकतात किंवा (country) काही ठिकाणी पर्यायी व्यवस्था केली जाऊ शकते.बीपी, शुगर, थायरॉइड, हृदयरोग यांसारख्या नियमित औषधांवर अवलंबून असलेल्या रुग्णांनी १९ मेपूर्वी आवश्यक औषधांचा साठा करून ठेवावा, असा सल्ला दिला जात आहे.महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनसह इतर राज्य शाखाही या बंदमध्ये सहभागी होत आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड, पुणे, मुंबईसह महाराष्ट्रात या बंदचा मोठा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे.

हेही वाचा

राष्ट्रवादीला मोठा धक्का, या बड्या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा

पलटण सूड घेणार की ‘किंग्ज’ मैदान मारणार? पहा धर्मशाळाचा पीच रिपोर्ट

सांगली फाटा उड्डाणपुलावर अपघात रिक्षाचा चक्काचूर, महामार्गावर 4 तास वाहतूक कोंडी