उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेमधील तांत्रिक कामांसाठी रविवारी १७ मे २०२६ रोजी मध्य रेल्वेकडून मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

रविवारी मध्य व हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक १७ मे रोजी रेल्वे मेगाब्लॉकचा फटका!
ठाणे-कल्याण व पनवेल-वाशी मार्ग प्रभावित रविवारी अनेक लोकल फेऱ्यांवर परिणाम
उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी १७ मे २०२६ रोजी मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.(Central Railway) मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण अप- डाऊन जलद मार्गावर तर हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशी अप डाऊन मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.
मध्य रेल्वे
कुठे – ठाणे कल्याण अप जलद मार्गावर डाऊन
कधी – सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत
या ब्लॉकदरम्यान डाऊन जल/सेमी जलद सेवा ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येतील, या व्यतिरिक्त कळवा, मुंब्रा, आणि दिवा स्थानकांवर थांबतील, (Central Railway) तसेच कल्याण येवून सुटणाऱ्या अप जलद /सेमी जलद सेवा कल्याण ते मुलुंड स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील, पुढे अप जलद लोकल सेवा दिवा, मुंब्रा, आणि कळवा स्थानकां दरम्यान थांबतील. अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल सेवा आपल्या निर्धारित वेळापत्रकाच्या १० मिनिटे उशिराने पोहोचेल. तसेच सीएसएमटी दादरकडे येणाऱ्या आणि जाणा-या अप डाऊन मेल-एक्सप्रेस पाचव्या आणि सहाव्या मार्गिकवर वळविण्यात येणाऱ्या आहे.
ब्लॉक कालावधीत पनवेल येथून सीएसएमटी दिशेने जाणाऱ्या अप मार्गावरील हार्बर सेवा आणि सीएसएमटी येथून पनवेल/बेलापूरच्या दिशेने जाणाऱ्या डाऊन हार्बर मागांवरील सेवा रद्द राहतील. पनवेल येथून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या अप मार्गावरील ट्रान्स-हार्बर सेवा आणि ठाणे येथून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या डाउन ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहील. सीएसएमटी ते वाशी सेक्शनवर विशेष गाड्या धावती. ठाणे-वाशी/नेरुळ दरम्यान ट्रान्स-हार्बर लाईन सेवा उपलब्ध राहणार आहे. (Central Railway) दरम्यान, डोंबिवलीकडून मुंबईत कामावर निघालेला गणेश अय्यर (वय 23) हा तरुण गर्दीच्या लोकलमधून पडल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. गुरुवारी कोपर रेल्वे स्थानकाजवळ घडलेल्या या दुर्घटनेत जखमी झालेल्या या तरुणावर डोंबिवलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या त्याची प्रकृती गंभीर आहे.
हेही वाचा
राष्ट्रवादीला मोठा धक्का, या बड्या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा
पलटण सूड घेणार की ‘किंग्ज’ मैदान मारणार? पहा धर्मशाळाचा पीच रिपोर्ट
सांगली फाटा उड्डाणपुलावर अपघात रिक्षाचा चक्काचूर, महामार्गावर 4 तास वाहतूक कोंडी