पाटणात रिक्षाचालकाची निर्घृण हत्या शवाचे 3 तुकडे करुन रेल्वे ट्रॅकवर फेकले, शीर अजूनही बेपत्ता

मित्रानेच मित्राचा केला घात! रेल्वे ट्रॅकवर मृताचे ३ तुकडे सापडताच त्याची ओळख चंदन कुमार करण्यात आली. तो पाटणातील रहिवाशी असून ओरोपी अजूनही फरार आहे. पोलिस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

बिहारमधील एका तरुणाच्या संशयास्पद मृत्यूने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.तपासादरम्यान पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाल्याने प्रकरण अधिक गूढ बनले आहे.एका जवळच्या व्यक्तीवर संशय व्यक्त केला जात असून पोलिसांकडून शोधमोहीम सुरू आहे.बिहारची राजधानी पाटणा येथून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. इथे एका २२ वर्षीय रिक्षाचालकाची निघृण हत्या करण्यात आली आहे. (missing) हत्येनंतर आरोपीने शवाचे तीन तुकडे करुन त्यांना रेल्वे रुळाच्या वेगेवगळ्या भागांमध्ये फेकून दिले. या घटनेनंतर परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपीला अद्याप ताब्यात घेण्यात आलं नसून पोलिस या प्रकरणाचा तपास करुन आरोपीला शोधण्याचा प्रयत्न करत आहे.

मृत व्यक्तीची ओळख चंदन कुमार अशी झाली आहे. त्याचे वय २२ वर्ष होते आणि तो एक रिक्षाचालक होता. कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, सकाळी जवळपास ११ वाजेच्या सुमारास चंदन घरातून बाहेर पडला. सुरुवातीला कुटुंबाला वाटले की, तो नेहमीप्रमाणे कामावर जात आहे. पण नंतर त्यांच्या लक्षात आले की, (missing) त्याने रिक्षाची चावी तर घरीच ठेवली होती. बराच काळानंतरही घरी न परतल्याने कुटुंबाला चंदनची काळजी वाटू लागली. रात्रीपर्यंत जेव्हा तो घरी परतला नाही तेव्हा त्यांनी विचार केला की, तो त्याच्या कोणत्या तरी मित्राघरी थांबला असावा. बुधवारी जेव्हा रेल्वे ट्रॅकवर तीन भागांत वाटलेले शरीराचे तुकडे मिळाले तेव्हा त्याची ओळख चंदन कुमार झाली. शरीराचे तुकडे करुन असे खुलेआम फेकण्यावरुनच आपण आरोपीच्या क्रुर वृत्तीचा अंदाज लावू शकतो. दरम्यान चंदनचे शरीर तर भेटले पण त्याचे शीर अजूनही बेपत्ता आहे.

मित्रावर शंकापोलिसांच्या तपासात, चंदनच्या मित्रावर संशय घेतला जात आहे कारण त्याला शेवटचा काॅल कौशल नगर येथे राहणाऱ्या त्याच्या मित्राने केला होता. मित्राचे नाव छोटू असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. छोटूच्या पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतले असता चाैकशीदरम्यान तिने पती छोटूनेच चंदनला मारल्याचे कबूल केले आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हत्येमागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. या प्रकरणाचा सखोल तपास करुन आरोपीपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला जात आहे. (missing) यासाठी पोलिस अनेक ठिकाणी छापे देखील टाकत आहे. या घटनेमुळे संतापलेल्या स्थानिक लोकांनी गुरुवारी अनिसाबाद-फुलवारी मुख्य रस्ता अडवला आणि पोलीस प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करायला सुरुवात केली. पोलिसांनी चंदनचे शीर लवकरात लवकर ताब्यात घ्यावे अशी मागणी आंदोलकांनी केली. पोलिसांनी त्यांची समजूत काढत ही नाकेबंदी हटवली. सध्या या परिसरात अतिरिक्त पोलिस दल तैनात करण्यात आला आहे.माहितीनुसार, पोलिस श्वानांच्या मदतीने चंदनचे शीर शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी इंदिरा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्थेत पाठवण्यात आला आहे. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.

हेही वाचा

राष्ट्रवादीला मोठा धक्का, या बड्या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा

पलटण सूड घेणार की ‘किंग्ज’ मैदान मारणार? पहा धर्मशाळाचा पीच रिपोर्ट

सांगली फाटा उड्डाणपुलावर अपघात रिक्षाचा चक्काचूर, महामार्गावर 4 तास वाहतूक कोंडी