टँकरने मागून धडक दिली, ट्रॅक्टर पुलावरून खाली कोसळला एकाच कुटुंबातल्या ७ जणांचा मृत्यू, १० जण गंभीर

ट्रॅक्टरला मागून टँकरने जोरदार धडक दिल्याने ट्रॅक्टर पुलावरून खाली कोसळून एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला, तर दहाहून अधिक(tractor) जण गंभीर जखमी झाले. हा भीषण अपघात शुक्रवारी (ता. १५) विजयनगर आणि कोप्पळ जिल्ह्यांच्या सीमेवरील तुंगभद्रा धरणाजवळ घडला.

मृतांची ओळख अद्याप पटलेली नसली, तरी ते सर्व जण कुडलगी तालुक्यातील मरळायनहळ्ळी गावचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.(tractor) हे सर्वजण कोप्पळ येथील हुलिगेम्मा देवीच्या दर्शनासाठी जात असताना हा अपघात झाला.वृद्धाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न मिळालेल्या माहितीनुसार, ट्रॅक्टरला मागून भरधाव टँकरने धडक दिली. धडकेनंतर दोन्ही वाहनांवरील चालकांचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर आणि टँकर पुलावरून खाली कोसळले. अपघात इतका भीषण होता की, घटनास्थळीच अनेकांचा मृत्यू झाला.

या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना तातडीने होस्पेट आणि कोप्पळ येथील रुग्णालयांत दाखल केले आहे. मृतदेह होस्पेट सरकारी रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविले आहेत. (tractor) काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.घटनेची माहिती मिळताच विजयनगर जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षक जान्हवी तसेच होस्पपेटचे पोलिस उपाधीक्षक के. पी. मुरलीधर यांनी घटनास्थळी आणि रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. अपघातानंतर परिसरात शोककळा पसरली. नातेवाईकांचा आक्रोश हृदयद्रावक होता. पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी बचावकार्य राबवत जखमींना रुग्णालयात हलविले.

हेही वाचा

राष्ट्रवादीला मोठा धक्का, या बड्या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा

पलटण सूड घेणार की ‘किंग्ज’ मैदान मारणार? पहा धर्मशाळाचा पीच रिपोर्ट

सांगली फाटा उड्डाणपुलावर अपघात रिक्षाचा चक्काचूर, महामार्गावर 4 तास वाहतूक कोंडी