उत्तर प्रदेशातील हापुड जिल्ह्यात एक भीषण अपघात झालाय. या अपघातात भाजप युवा मोर्चाच्या नेत्यासह (accident) त्याच्या तीन मित्रांचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. लग्न समारंभ आटोपून परतत असताना त्यांची कार रस्त्याकडेला उलटल्यानं ही दुर्घटना घडली. कार रस्त्याकडेला एका खड्ड्यात कोसळली. अपघातानंतर घटनास्थळी धाव घेत स्थानिकांनी बचावकार्य राबवलं.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, रात्री उशिरा मेरठच्या जागृती विहार मंडळचे भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष विशांत त्यागी, लवी चौहान, ललित चौहान, मिथून यांच्यासोबत कारने एका लग्न सोहळ्यासाठी गेले होते. लग्न सोहळ्याहून परतत असताना त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला.रात्री एक वाजण्याच्या सुमारास सर्वजण लग्न सोहळ्यावरून परतत होते. (accident) त्यावेळी बहादुरगढमधील डहरा कुटी वेट रोडवर असलेल्या एका वळणावर कारवरील नियंत्रण सुटलं. वेग जास्त असल्यानं कार तीन ते चार वेळा उलटली आणि रस्त्याकडेला असलेल्या खड्ड्यात कोसळली. अपघातात कारचा चुराडा झाला होता. त्यात चारही तरुण अडकून पडले होते.
अपघातानंतर घटनास्थळी स्थानिकांनी धाव घेतली. स्थानिकांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली आणि कारमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर जखमींना रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं.डॉक्टरांनी रुग्णालयात तपासणीनंतर भाजप युवा मोर्चाचा नेता विशांत त्यागी आणि मिथून यांना मृत घोषित केलं. (accident) तर गंभीर जखमी असलेल्या लवी चौहान आणि ललित चौहान यांना मेरठला उपचारासाठी पाठवलं. मात्र उपचारावेळी लवी चौहानचा मृत्यू झाला. तर ललितची प्रकृती गंभीर आहे. विशांत त्यागी त्याच्या मित्रांसोबत नवजीवन नावाचं खासगी रुग्णालय चालवत होता.
हेही वाचा
राष्ट्रवादीला मोठा धक्का, या बड्या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा
पलटण सूड घेणार की ‘किंग्ज’ मैदान मारणार? पहा धर्मशाळाचा पीच रिपोर्ट
सांगली फाटा उड्डाणपुलावर अपघात रिक्षाचा चक्काचूर, महामार्गावर 4 तास वाहतूक कोंडी