भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टेस्ट मालिकेतील पहिला सामना लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर रंगतदार ठरतोय. सामन्यात दोन्ही संघ जबरदस्त कामगिरी करत आहेत. दोघेही आपला बेस्ट देऊन सामना जिंकण्याच्या दिशेने टार्गेट करत आहेत. मात्र तिसऱ्या दिवसाच्या खेळादरम्यान एक व्हिडीओ(Video) सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हायरल व्हिडीओमध्ये मोहम्मद सिराज आणि इंग्लंडचा युवा फलंदाज हैरी ब्रूक यांच्यात चांगलाच शाब्दिक खटाका उडालेला पाहायला मिळाला.

सामन्याच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात भारतासाठी उत्तम झाली. प्रसिद्ध कृष्णाने पहिल्याच सत्रात शतकवीर ओली पोपला माघारी धाडलं. त्यानंतर हैरी ब्रूकने डाव सावरण्याचा प्रयत्न केला(Video). खेळपट्टीवर स्थिरावत असतानाच भारताचा दमदार खेळाडू मोहम्मद सिराज गोलंदाजी करायला आला आणि त्याच्याच एका डिलिव्हरीनंतर ब्रूकने डिफेन्सिव्ह शॉट खेळला. त्यानंतर दोघांमध्ये काहीशा तिखट शब्दांची देवाणघेवाण झाली अर्थात दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आणि आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
ब्रूकचं शतक हुकलं
ब्रूक उत्तम खेळी करत होता आणि त्याच्याकडून शतकाची अपेक्षा होती. मात्र 99 धावांवर असतानाच प्रसिद्ध कृष्णाने त्याला तंबूत पाठवले. शार्दुल ठाकूरने सोपा झेल टिपत इंग्लंडसाठी मोठा धक्का दिला.
भारताची जबरदस्त फलंदाजी
भारताने पहिल्या डावात शुभमन गिल, ऋषभ पंत आणि यशस्वी जायसवाल यांच्या दमदार शतकांच्या जोरावर 471 धावा ठोकल्या. इंग्लंडचा प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न सुरू आहे.
टीम इंडिया – प्लेइंग XI
केएल राहुल, यशस्वी जायसवाल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार आणि यष्टिरक्षक), करुण नायर, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा.

इंग्लंडची प्लेइंग XI
जॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, हैरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टिरक्षक), क्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर.
#MohammedSiraj and #HarryBrook in a fiery exchange as the heat is on at Headingley! #ENGvIND 1st Test Day 3 LIVE NOW Streaming on JioHotstar https://t.co/SIJ5ri9fiC pic.twitter.com/nKZTSeFZt1
— Star Sports (@StarSportsIndia) June 22, 2025
भारत-इंग्लंड टेस्ट इतिहास
इंग्लंडमध्ये खेळले गेलेले टेस्ट सामने:
- एकूण – 67
- भारत जिंकला – 9
- इंग्लंड जिंकला – 36
- ड्रॉ – 22
भारतामध्ये खेळले गेलेले टेस्ट सामने:
- एकूण – 69
- भारत जिंकला – 26
- इंग्लंड जिंकला – 15
- ड्रॉ – 28
हेही वाचा :
एकमेकींच्या झिंझ्या उपटल्या, थोबाडीत मारल्या अन्…; लोकलमध्ये महिलांची रक्तबंबाळ हाणामारी
नागरिकांनो सावधान! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी
आज अनेक शुभ संयोग; कन्यासह ‘या’ 5 राशींवर भोलेनाथ होणार प्रसन्न, मागाल ते मिळेल