भारतीय संघात सातत्याने संधी न मिळाल्यामुळे फिरकीपटू कुलदीप यादव याने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. इंग्लंड दौऱ्यावर एकदिवसीय मालिकेत अंतिम संघात स्थान न मिळाल्यानंतर त्याने काउंटी क्रिकेटमध्ये खेळण्याचा मार्ग स्वीकारला आहे. आता तो यॉर्कशायर संघाकडून काउंटी स्पर्धेत मैदानात उतरणार असून त्याच्या या निर्णयाची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

गेल्या काही महिन्यांत भारतीय संघ (Team India) सातत्याने वेगवेगळ्या संयोजनांसह मैदानात उतरला. या बदलांमुळे अनेक खेळाडूंना संधी मिळाली, तर काही अनुभवी खेळाडूंना बाकावर बसावे लागले. इंग्लंडविरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेत कुलदीप यादवला एकाही सामन्यात अंतिम अकरामध्ये स्थान मिळाले नाही. यामुळे संघ व्यवस्थापनाच्या निर्णयावर अनेक माजी खेळाडू आणि चाहत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विशेषतः कर्णधार शुभमन गिल आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या निवडीवरही टीका करण्यात आली. इंग्लंड दौऱ्यातील तिन्ही एकदिवसीय सामने कुलदीप यादव बाहेर राहिला. लॉर्ड्स येथे झालेल्या सामन्यात वॉशिंग्टन सुंदर दुखापतग्रस्त झाल्यानंतरही त्याला अंतिम अकरामध्ये संधी न मिळाल्याने चर्चांना अधिक उधाण आले. दरम्यान, श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा अद्याप झालेली नसल्याने कुलदीपने उपलब्ध वेळेचा उपयोग करण्याचा निर्णय घेत काउंटी क्रिकेटमध्ये खेळण्यास प्राधान्य दिले आहे.
कुलदीप यादव 24 जुलै ते 2 ऑगस्टदरम्यान यॉर्कशायरकडून देशांतर्गत एकदिवसीय स्पर्धेत खेळणार आहे. याशिवाय तो काउंटी चॅम्पियनशिप मधील तीन सामन्यांमध्येही यॉर्कशायरचे प्रतिनिधित्व करणार आहे. (team India) त्यानंतर श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झाल्यास तो भारतात परतणार असून, आवश्यकतेनुसार पुन्हा इंग्लंडमध्ये दाखल होणार आहे. इंग्लंडमधील खेळपट्ट्यांवर खेळण्याचे आव्हान नेहमीच आवडते आणि संघ व्यवस्थापनाशी चर्चा केल्यानंतर यॉर्कशायरमध्ये सामील होण्यास आपण उत्सुक असल्याचे कुलदीप यादवने सांगितले.
कुलदीप यादव यापूर्वी तीन वेळा इंग्लंड दौऱ्यावर गेला असून 2018 मध्ये त्याने एकमेव कसोटी सामना खेळला होता. (team India) त्या सामन्यात त्याला केवळ नऊ षटके गोलंदाजी करण्याची संधी मिळाली होती. यॉर्कशायर क्लबकडून यापूर्वी सचिन तेंडुलकर , युवराज सिंग , चेतेश्वर पुजारा आणि मयंक अग्रवाल यांसारखे भारतीय क्रिकेटपटू खेळले आहेत. ऋतुराज गायकवाड याने 2025 मध्ये या क्लबशी करार केला होता, मात्र वैयक्तिक कारणांमुळे तो खेळू शकला नव्हता. आता कुलदीप यादव यॉर्कशायरचे प्रतिनिधित्व करणारा पाचवा भारतीय खेळाडू ठरणार असून काउंटी क्रिकेटमधील त्याच्या कामगिरीकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
झिम्बाब्वेविरुद्धचा सामना कुठे पाहता येणार? योग्य माहिती जाणून घ्या?