आता खरेदी करणं शक्यच नाही सोन्याचे भाव चांगलेच वाढले, आज 10 ग्रॅमसाठी?

आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम आता सराफा बाजारावरही स्पष्टपणे दिसू लागला आहे. अमेरिका-इराणमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित गुंतवणुकीकडे कल वाढल्याने सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ नोंदवली गेली आहे. (gold and silver) त्यामुळे ऐन खरेदीच्या हंगामात ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

22 जुलै रोजी जळगाव सराफा बाजारात सोन्याच्या दरात तब्बल 2 हजार रुपयांची वाढ झाली. या वाढीनंतर जीएसटीसह 10 ग्रॅम (एक तोळा) सोन्याची किंमत 1 लाख 49 हजार 350 रुपयांवर पोहोचली आहे. (gold and silver) त्यामुळे सोन्याच्या दरांनी पुन्हा एकदा उच्चांक गाठल्याची चर्चा बाजारात सुरू आहे.चांदीच्या किमतीतही मोठी उसळी पाहायला मिळाली आहे. एका दिवसात तब्बल 5 हजार रुपयांची वाढ झाल्याने जीएसटीसह एक किलो चांदीचा दर 2 लाख 36 हजार 900 रुपयांवर पोहोचला आहे. या वाढीमुळे दागिने खरेदी करणारे तसेच गुंतवणूकदार दोघांनाही अधिक खर्च करावा लागणार आहे.

बाजारातील तज्ज्ञांच्या मते, जागतिक स्तरावरील भू-राजकीय तणाव, डॉलरमधील चढ-उतार आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील मौल्यवान धातूंच्या वाढत्या मागणीमुळे सोन्या-चांदीच्या किमतींवर दबाव कायम आहे. (gold and silver) त्यामुळे आगामी काळातही दरांमध्ये चढ-उतार सुरू राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.दरम्यान, सराफा बाजारातील या तेजीमुळे लग्नसराई, सणासुदीची खरेदी आणि गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना खरेदीपूर्वी किंमतींचा बारकाईने आढावा घ्यावा लागणार आहे.

हेही वाचा :

झिम्बाब्वेविरुद्धचा सामना कुठे पाहता येणार? योग्य माहिती जाणून घ्या?

आमदार नारायण कुचे यांच्या कारचा भीषण अपघात ३ जण गंभीर जखमी?

मग अट्टहास कशासाठी केला?