दानोळी येथील घाऊक भाजीपाला व्यावसायिक भरतेश राजगोंडा (Kidnapping) टोपगोंडा वय ४२ या तरुणाचे अपहरण करून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अपहरणकर्त्यांनी २५ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. या प्रकारामुळे दानोळी परिसरात खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी राजदीप ताडे, मंथन चंदुरे रा. दानोळी, ता. शिरोळ यांना अटक केली आहे. पोलिसांच्या दिरंगाईमुळे जीव गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. याप्रकरणी पोलिसांनी संशयित राजदीप ताडे, मंथन चंदुरे यांना ताब्यात घेतले आहे. ते दोघेही गावातील एका नागरिकाचे भाचे आहेत. त्यांची पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे.

दरम्यान, भरतेश यांचे अपहरण झाल्याची आणि खंडणीचा फोन (Kidnapping) आल्याची माहिती नातेवाईकांनी मध्यरात्रीच जयसिंगपूर पोलिस ठाण्यात दिली होती; मात्र पोलिसांनी कोणतीही हालचाल केली नाही. त्यानंतर नातेवाईक, मित्रमंडळी व पोलिस पाटील प्रशांत नेजकर यांनी रात्रभर भरतेश यांचा शोध घेतला.मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास भरतेश यांचा मृतदेह एका शेतामध्ये आढळून आला. त्यांच्या शरीरावर मारहाणीसहीत कानामागे चाकूचा खोलवर वार, तसेच मानेवर, पोटावर, कानाला व गुप्तांगावर विजेचे शॉक दिल्याच्या खुणा दिसून येत होत्या.
या मारहाणीनंतर त्यांचा गळा दाबून खून केल्याचे प्राथमिक तपासात (Kidnapping) आढळून आले आहे. अपहरण केल्यानंतर मध्यरात्रीच त्यांचा खून करण्यात आल्याचाही पोलिसांचा संशय आहे. भरतेशच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई, भाऊ असा परिवार आहे.एका मोबाईल व्यावसायिकावर संशयितांचा आधीपासूनच डोळा होता. त्याला अडवून लुटण्याचा किंवा अपहरण करण्याचा त्यांचा डाव होता. मात्र, त्या रात्री संबंधित व्यावसायिक अपेक्षेप्रमाणे त्या मार्गावर आलाच नाही. त्याचवेळी टोपगोंडा हे घरी जाताना संशयितांच्या तावडीत सापडले आणि त्यांचे अपहरण करून आरोपींनी आपला डाव साधला.
रात्री अकरा वाजता नातेवाईक पोलिस ठाण्यात तक्रारीसाठी गेले होते. खंडणीच्या फोनचे रेकॉर्डिंग ऐकविल्यानंतरही पोलिसांनी केवळ बेपत्ता झाल्याची नोंद घेऊन, ‘उद्या बघू’, असे सांगून तक्रारदारांना परत पाठविले. त्याचवेळी पोलिसांनी तपास आणि हालचाल केली असती; तर कदाचित भरतेश यांचा जीव वाचला असता, असा सूर नागरिकांमध्ये होता. आज सकाळीही शोध घेत असताना काहींनी पोलिसांना लवकर तपास करण्याची विनंती केली असता पोलिसांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
हेही वाचा
१८० मुलींचे लैंगिक शोषण, आरोपी निघाला MIM चा नेता
दहावीच्या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली! उद्या १० वीचा निकाल लागणार?
अविवाहितांना कॅन्सरचा धोका ८५% जास्त; रिसर्चमधून धक्कादायक माहिती समोर