कोल्हापूर/ विशेष प्रतिनिधी …
नुकत्याच संपन्न झालेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात “धर्म स्वातंत्र्य 2026″हे धर्मांतर विरोधी विधेयक दोन्ही सभागृहात संमत करण्यात आले आहे. या विधेयकाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये वेगळ्या मार्गाचा अवलंब करून हिंदू तरुणींचे धर्मांतर घडवून आणणाऱ्या एका टोळीला नाशिक पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार मल्टी नॅशनल कंपनीच्या नाशिक कार्यालयात गेल्या काही महिन्यांपासून घडत होता. एकूण हे प्रकरण तपासून पाहिले तर यामध्ये कंपनीचे वरिष्ठ अधिकारीही सहभागी असले पाहिजेत असा संशय आहे.
सध्या नाशिक येथील भोंदू बाबा खरात प्रकरण राज्यभर नव्हे तर देशभर गाजत असताना याच नाशिकमध्ये एका कार्पोरेट कंपनीत तरुणींचे लैंगिक शोषण केले जात होते आणि नंतर त्यांना मुस्लिम धर्मात विधिवत घेतले जात असल्याचा धक्कादायक प्रकार नाशिक पोलिसांनीच उघडकीस आणलेला आहे. नाशिक पोलिसांचे याबद्दल अभिनंदनच केले पाहिजे. पोलिसांनी या प्रकरणात सहा तरुणांना अटक केली असून पाच जणांच्या कडे अखोल चौकशी केली जात आहे. हे सर्व संशयित आरोपी मुस्लिम असून ते एकाच भागात राहत आहेत. विशेष म्हणजे हे तरुण एका वेगळ्या प्रकारे जिहादी रॅकेट चालवत असावेत असा तपास अधिकाऱ्यांना संशय आहे.
मल्टिनॅशनल कंपनीमध्ये नोकरी लावण्याचे आमिष सुशिक्षित तरुणींना दाखवले जात होते. आणि त्यानंतर जाळ्यात सापडलेल्या तरुणींचे लैंगिक शोषण केले जात होते. त्याच्या क्लिप तयार केल्या जात होत्या. नंतर त्या व्हायरल करण्याची धमकी देऊन या तरुणींना “इस्लाम कबूल”करण्यास भाग पाडले जात होते. या कंपनीतील एका तरुणाला बेरोजगार तरुणींना नोकरी लावतो असे आमिष दाखवून त्यांना जाळ्यात ओढायचे काम दिले होते. मात्र अशा प्रकारे तरुणी मिळत नाहीत असे त्या तरुणांनी सांगितल्यानंतर त्याला मारहाण करण्यात आली इतकेच नाही तर त्याचे सक्तीने धर्मांतर केले. हा कार्पोरेट जिहाद पोलिसांनी उघडकीस आणला. आणि नंतरच्या तपासात काही गरजू तरुणींवर लैंगिक आणि मानसिक अत्याचार केल्याच्या घटना उघड झाल्या. हे सर्व नाशिकच्या कार्पोरेट कंपनीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरू होते, पण त्याची माहिती कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना नव्हती असे म्हणणे चुकीचे ठरेल. कंपनीतील काही अधिकारी या प्रकरणात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभागी असावेत.
त्याशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणावर तरुणींचे लैंगिक शोषण आणि जिहाद होणे अशक्य आहे. या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही तपासाच्या रडारवर आणले पाहिजे. आणि तसे आणले जाईलही. नाशिकच्या भोंदू बाबा अशोक खरात यानेही, अडचणीत सापडलेल्या महिलांचे प्रश्न सोडवतो असे वातावरण तयार करून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार सध्या गाजतो आहे. आणि नेमक्या याच वेळी नाशिकमध्येच तेही एका कार्पोरेट कंपनीत नोकरी लावण्याच्या आमिषाने तरुणींच्यावर लैंगिक अत्याचार केले गेले आणि नंतर त्यांना इस्लाम कबूल करण्यास सांगण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. अशोक खरात इतकेच हे प्रकरण सुद्धा अतिशय गंभीर आहे आणि आता त्याची एस. आय. टी. कडून चौकशी सुरू आहे. गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात तसेच देशातही “लव्ह जिहाद” हा प्रकार मोठ्या संख्येने सुरू आहे. हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे आणि नंतर त्यांच्याशी निकाह करून त्यांना इस्लाम मध्ये आणायचे हे षडयंत्र सुरू आहे.
या लव्ह जिहाद ला हा बसावा हा हेतू समोर ठेवून राज्य शासनाने”धर्म स्वातंत्र्य 2026″हे धर्मांतर विरोधी विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर करून घेतले आहे. अजूनही हे विधेयक कायद्यात रूपांतरित करण्यासाठी राज्यपालांच्याकडे जायचे आहे, किंवा त्यांच्या टेबलावर अंतिम स्वाक्षरीसाठी प्रलंबित असेल. अशा प्रकारचे एक विधेयक लव्ह जिहादच्या विरोधी येत आहे हे माहीत असूनही नाशिकच्या कार्पोरेट कंपनीत धर्मांतराचा हा वेगळा खेळ खेळला जात होता. याचा अर्थ हे मुद्दाम आणि लोकसंख्या वाढीचे शस्त्र समोर ठेवून करणाऱ्या अदृश्य शक्ती कार्यरत आहेत असा होतो.
काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रातील काही शहरात लव्ह जिहाद विरोधी ज्यांना आकर्षण मोर्चे सुद्धा करण्यात आले होते आणि त्याचे नेतृत्व महायुती मधील एक मंत्री नितेश राणे यांनी केले होते. तेव्हापासूनच महाराष्ट्राच्या धर्मांतर विरोधी कायदा आणण्याचा विचार भारतीय जनता पक्षाकडून सुरू होता. त्याचाच एक भाग म्हणून”धर्म स्वातंत्र्य 2026″हे विधेयक आणले होते आणि आता त्याचे लवकरच कायद्यात रूपांतर होईल. सुशिक्षित पण तरीही बेरोजगार असलेल्या तरुणींची संख्या मोठी आहे. अनेक मुली जॉब च्या शोधात असतात. त्यांना आय.टी. कंपनी हवी असते.अशावेळी कोणीतरी त्यांच्याकडे आला आणि त्यांनी सांगितले की आयटी कंपनीत तुम्हाला जॉब मिळवून देतो तर रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणी कोणताही विचार न करता त्या तरुणाच्या आहारी जातात.
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणीना “इस्लाम कबूल” करण्यास सोपे जाते असा विचार करून त्यांचे आधी लैंगिक शोषण केले जात होते आणि नंतर त्यांना इस्लाम मध्ये येण्यासाठी सक्ती केली जात होती. गुन्हा करण्याची ही नवीन पद्धत नाशिक पोलिसांनी अत्यंत कौशल्याने उघडकीस आणली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक पोलिसांचे खास अभिनंदन केले आहे