एका रात्री फेरफटका मारण्यासाठी बाहेर गेलेल्या ओमकारला भयाण गल्लीत नाचणाऱ्या रहस्यमयी (Mysterious)काळ्या साडीतल्या स्त्रिया दिसतात, आणि त्यानंतर त्याच्या आयुष्यात एक झंझावात घडतो. तो अनुभव आजही त्याच्या अंगावर शहारे आणतो.भयाण रात्र होती. मुलुंड कॉलनीमध्ये तशी रात्रीची गर्दळ फार असते. पण त्या रात्री फार कुणी भटकत नव्हतं. मी ओमकार, एकटाच! कंटाळा आला म्हणून जरा बाहेर फेरफटका मारून येऊ, असं ठरवलं. घरी सगळे गाढ झोपेत होते. रात्रीचे जवळजवळ साडे 12 ते 1 च्या दरम्यान घड्याळाचा काटा दिसत होता. घराबाहेर आलो आणि बाहेर पाहतो तर काय भयाण शांतता आणि काळोखी रात्र!

मुंबई म्हणलं तर गर्दळ आलीच पण या रात्री साधं मांजरूही बाहेर फिरकताना दिसत नव्हतं. मला तर झोप नव्हतीच मुळात म्हणून मी बाहेर फेरफटका मारण्याचं ठरवलंच होतं, वातावरण जरी भयाण वाटत असलं तरी बाहेर आलोच आहे तर घरी परतण्यापेक्षा फेरफटका मारूनच येऊ(Mysterious). रस्त्यावरून चालत होतो. रस्त्यावर फार काही गाड्याही नव्हत्या. हायवेला एक प्रसिद्ध वडापाव वाला आहे, तो मध्यरात्रीही सुरू असतो. हायवेवरच्या दुरून येणाऱ्या गाड्या या तिथेच नाश्त्यासाठी थांबत असतात. मी म्हटलं, चला बाहेर आलोच आहोत तर पोटाला जरा सुख देऊ. आता याच वाटेने गेलो तर खूप वेळ जाईल म्हणून मी शॉर्टकट मारून हायवेवर जाण्याचा बेत केला.
आमच्या येथून हायवेला जाण्यासाठी मध्ये पाइपलाइनच्या शेजारी काही चाळी आहेत. त्या गल्लीगोळातून जात-जात मस्त वडापाव किंवा इतर खाण्याचा आस्वाद घेईल असं मी ठरवलं. चालता चालता त्या पाइपलाइनच्या शेजारी असणाऱ्या चाळीत येऊन पोहचलो. गल्ली तशी फार लहान! पूर्ण अंधार पसरलेल्या त्या भागात छम-छम बांगड्यांचा आवाज येत होता. जसं जसा मी जवळ गेलो तसं तसा तो आवाज वाढू लागला. क्षणार्धात मी स्तब्ध झालो. तिथे चार स्त्रिया रिंगण करून नाचत होत्या. चौघांनी काळया रंगाची साडी परिधान केली होती. मी स्तब्ध वेडा प्रश्नांच्या पुरात वाहून गेलो. घामाने भिजलेला मी ते पाहून काही मिनिटांसाठी जागीच ताठ उभा झालो. त्या स्त्रियांचा काही लक्ष माझ्याकडे नव्हता.

काळोख्या भागात त्या स्त्रिया नाचत आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त त्या भागात फक्त मी होतो. तरी त्यांच्या बाजूने वाट काढत मी पुढे गेलो. जसा पुढे गेलो तसा आवाज थांबला. पण मी काही मागे पाहिलं नाही. चालत चालत मी हायवेवर आलो. हायवेवर वडापावचे दुकान बंद होते. एकही गाड्या त्या भल्या मोठ्या हायवेवर दिसत नव्हती, हा प्रसंग असा होता की जणू मी माझ्या जगात नाही, कुठे भलतीकडेच आल्याचा भास मला जाणवत होता.माझ्यासोबत घडतय तरी काय? याचा सुगावा तर मला काहीच लागेना. पण त्या नाचणाऱ्या बाया कोण? याचा उत्तर शोधण्यासाठी मी घराकडे परतीच्या त्याच वाटेने मार्गस्थ झालो. पुन्हा त्या गल्लीमध्ये येऊन पोहचलो.
भयाण शांतता आणि भयाण काळोख! पण यावेळी तिथे त्या नाचणाऱ्या बाया नव्हत्या. त्या गल्लीत फक्त नि फक्त मी एकटा होतो. कुणी नसल्याने माझ्या जीवात जीव तर आला होता म्हणून मी गल्ली चालण्यास सुरुवात केली. जसा मी गल्लीच्या त्या टोकाला पोहचलो माझ्या मागे पुन्हा त्या बांगड्यांचा आक्रोश जाणवू लागला. मी वळून मागे पाहिले. तिथे त्या चार बाया रिंगण करून नाचताना मला पुन्हा दिसल्या. मी तशाच दम टाकून घराकडे पळालो. त्या दिवसानंतर मी त्या वाटेला दिवसाही सहसा फिरकत नाही. आजही तो प्रसंग आठवला की माझ्या हृदयात धडकी भरते.
हेही वाचा :
WFI चा मोठा निर्णय: बनावट कागदपत्र प्रकरणी 11 कुस्तीपटूंना निलंबित
धर्म बदल, वैवाहिक वाद आणि हत्या – हुमा कुरेशीच्या भावामागील धक्कादायक सत्य
अमेरिकेतला “वेडा तुघलक”