पोटात वारंवार वेदना किंवा गॅस होत असेल चुकूनही करू नका दुर्लक्ष! शरीरात वाढू शकतो ‘या’ गंभीर आजाराचा धोका

पोटात वारंवार गॅस किंवा अपचनाची समस्या उद्भवत असेल (stomach)तर दुर्लक्ष न करता डॉक्टरांचं सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करणे आवश्यक आहे. पोटाच्या समस्या वाढू लागल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात.

मधुमेह किंवा थायरॉईड होऊ नये म्हणून आरोग्याची कशी काळजी घ्यावी?

वारंवार अपचनाची समस्या कशामुळे उद्भवते?

पोटाच्या समस्या कोणत्या आजारांमुळे वाढतात?

दैनंदिन आहारात सतत तिखट आणि तेलकट पदार्थांचे (stomach) अतिसेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. याशिवाय अपुऱ्या झोपेचा परिणाम पचनक्रियेवर लगेच दिसून येतो. त्यामुळे आहारात सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. पोटासंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर अनेक लोक दुर्लक्ष करतात. पण वारंवार दुर्लक्ष करणे आरोग्यासाठी धोक्याचे ठरू शकते. पोटात दुखणे, पाठीमध्ये दुखणे, गॅस, अपचन इत्यादी समस्या सगळ्यांचं उद्भवतात. पण नेहमीच पोटाच्या समस्या वाढू लागल्यानंतर गंभीर आजार होऊ शकतात. अनेक लोक अपचनाच्या समस्यांना ऍसिडिटी समजून दुर्लक्ष करतात. पण असे न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार करावे. बऱ्याचदा पोटासंबंधित वाढलेल्या समस्यांमुळे डायबिटीस किंवा थायरॉइड होण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला डायबिटीस किंवा थायरॉइड होण्याआधी शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.

बद्धकोष्ठता:
शरीरामध्ये साचून राहिलेले विषारी घटक आरोग्यासाठी अतिशय घातक असतात. पोटात साचून राहिलेल्या घाणीमुळे बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवण्याची शक्यता असते. पोटातील स्नायूच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर शरीराची पचनक्रिया अतिशय स्लो होऊन जाते. ज्यामुळे बद्धकोष्ठता होऊन सतत पोट बिघडणे किंवा पोटात वेदना होतात. वारंवार तुम्हाला तर बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने मधुमेह आणि थायरॉइडची तपासणी करून घ्यावी.

गॅस-अ‍ॅसिडिटी:
गॅस-अ‍ॅसिडिटी होणे ही अतिशय सामान्य समस्या आहे. हल्ली प्रत्येक व्यक्ती गॅस-अ‍ॅसिडिटीच्या समस्येने त्रस्त आहे. वारंवार तुम्हाला जर गॅस-अ‍ॅसिडिटी होत असलेल्या थायरॉईड तपासणी करून घ्यावी. त्यामुळे वेळीच तपासणी करून योग्य ते उपचार करावे. मधुमेह झाल्यानंतर सुद्धा पोटाच्या समस्या उद्भवतात.

सतत पोटात जडपणा किंवा मळमळ वाटणे:
आपल्यातील अनेकांना अतिशय हलक्या किंवा सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन केल्यानंतर सुद्धा पोटात जडपणा किंवा मळमळ वाटू लागते. ही सामान्य समस्या नसून आरोग्यासंबंधित गंभीर आजारांचे संकेत आहेत. सतत मळमळ किंवा उलट्या झाल्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन जाते. ज्यामुळे शरीर डिहायड्रेट होते.

हेही वाचा :

अखेर तो क्षण आलाच…पाच पोरांचा बाप झाल्यानंतर रोनाल्डोने घेतला लग्नाचा निर्णय

डोळ्यांखाली वाढलेल्या काळ्या वर्तुळांमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग ‘हे’ उपाय करून मिळवा आराम, त्वचा होईल उजळदार

इचलकरंजीत उद्या मिलिडीज पंचम या संगीतमय कार्यक्रम