Indian Premier League 2026 च्या 19 व्या हंगामात Gujarat Titans ने सुरुवातीच्या अपयशानंतर जबरदस्त पुनरागमन करत स्पर्धेला नवी रंगत आणली आहे. Shubman Gill यांच्या नेतृत्वाखालील संघाने (comeback) पहिल्या दोन सामन्यांमध्ये Punjab Kings आणि Rajasthan Royals विरुद्ध पराभव स्वीकारला होता. मात्र त्यानंतर संघाने आपली लय सापडत सलग तीन विजयांची नोंद केली आहे.

१७ एप्रिल रोजी अहमदाबादच्या Narendra Modi Stadium येथे झालेल्या सामन्यात गुजरातने Kolkata Knight Riders वर ५ विकेट्सने मात करत विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली. केकेआरने दिलेल्या १८१ धावांच्या आव्हानाचा गुजरातने १९.४ षटकांत यशस्वी पाठलाग केला. या विजयामुळे केवळ आत्मविश्वासच वाढला नाही, तर गुणतालिकेतही मोठी झेप घेतली.
सलग तिसऱ्या विजयासह गुजरातने थेट टॉप ४ मध्ये प्रवेश केला आहे. सहाव्या स्थानावरून चौथ्या क्रमांकावर झेप घेत गुजरातने ५ सामन्यांत ६ गुणांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे या सामन्यापूर्वी निगेटिव्ह असलेला नेट रनरेट सुधारत आता प्लसमध्ये गेला आहे. यामुळे पुढील सामन्यांमध्ये गुजरातचा आत्मविश्वास अधिकच बळकट होण्याची चिन्हे आहेत.
गुजरातच्या या यशाचा परिणाम इतर संघांवरही दिसून आला आहे. Sunrisers Hyderabad आणि Delhi Capitals या दोन्ही संघांना प्रत्येकी एका स्थानाने घसरण सहन करावी लागली आहे. दुसरीकडे, केकेआरचा पराभवांचा सिलसिला सुरूच राहिल्याने त्यांची स्थिती आणखी बिकट झाली असून ते गुणतालिकेत तळाशीच आहेत. येथून प्लेऑफमध्ये पोहोचणे त्यांच्यासाठी कठीण मानले जात आहे.
दरम्यान, Punjab Kings संघाने शानदार कामगिरी करत अव्वल स्थान कायम ठेवले आहे. त्यांच्या पाठोपाठ Royal Challengers Bengaluru आणि Rajasthan Royals अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत. दोन्ही संघांनी समान सामने जिंकले असले तरी नेट रनरेटच्या जोरावर आरसीबीला वरचढ स्थान मिळाले आहे.
एकंदरीत, सुरुवातीच्या अपयशानंतर गुजरात टायटन्सने केलेलं जोरदार कमबॅक हे या हंगामातील सर्वात चर्चेचं ठरत असून पुढील सामन्यांमध्ये हा संघ आणखी किती प्रभावी ठरतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा
आता 100 रुपयांच्या मालावरही द्यावा लागणार टॅक्स
जास्त पगार असूनही बँक कर्ज देत नाहीये? तर ‘या’ ४ गोष्टींकडे लक्ष द्या
MSRTC कडून एसटी बस दरात मोठी वाढ! प्रत्येक तिकिटावर अतिरिक्त चार्जही लागू