लग्नाच्या अवघ्या ४८ दिवसांत दुर्दैवी शेवट डॉक्टर पतीच्या छळाला कंटाळून महिलेची आत्महत्या?

अंबरनाथ पूर्व येथील पालेगाव परिसरात हुंड्यासाठी होत असलेल्या कथित छळामुळे एका २८ वर्षीय नवविवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (shocking) लग्नानंतर अवघ्या दीड ते दोन महिन्यांतच संसाराचा शेवट करत विशाखा नितीन तीळकर यांनी राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांनी पती, सासू आणि दीर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील आनंदनगर (हिंगणे खुर्द) परिसरात वास्तव्यास असलेल्या आणि रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या अनिल शिंदे यांनी दोन महिन्यांपूर्वी आपल्या एकुलत्या एक मुलगी विशाखाचा विवाह अंबरनाथमधील नितीन तीळकर याच्याशी केला होता. नितीन हा व्यवसायाने डॉक्टर असल्याचे सांगितले जाते.

मात्र लग्नानंतर काही दिवसांतच विशाखाकडे माहेराहून पाच तोळे सोने आणि रोख रक्कम आणण्याची मागणी करण्यात येत होती, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. या मागणीसाठी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात येत असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. (shocking) तसेच तिला घरातच ठेवून इतरांशी संपर्क साधण्यावर निर्बंध घालण्यात आले होते, असा आरोप नातेवाइकांनी केला आहे.सासरच्या कथित जाचाला कंटाळून विशाखाने १६ जून रोजी राहत्या घरातील बेडरूममध्ये ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.

या प्रकरणी मृत महिलेचे वडील अनिल शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात पती नितीन तीळकर, सासू आणि दीर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी डॉक्टर पतीला अटक केली असून सासू आणि दीर यांचा शोध सुरू आहे.या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक चित्रा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, (shocking) आत्महत्येमागील सर्व कारणांचा सखोल तपास केला जात आहे.

हेही वाचा :

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! मे महिन्याचे 1500 रुपये बँक खाते करा चेक?

जल व्यवस्थापनाचे तीन तेरा पाच दशकांनंतर पाणीबाणी!

स्लोव्हाकियाशी भागीदारी वाढवणार : पंतप्रधान मोदी