एका वर्षातील चमकदार परतावा पाहून म्युच्युअल फंड निवडण्याची सवय अनेक (mutual funds) गुंतवणूकदारांमध्ये दिसून येते. मात्र तज्ज्ञांच्या मते ही पद्धत दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी धोकादायक ठरू शकते. ‘ईटी’च्या अहवालानुसार, राधिका गुप्ता यांनी गुंतवणूकदारांना स्पष्ट इशारा दिला आहे की केवळ एका वर्षाच्या कामगिरीवर आधारित निर्णय घेणे चुकीचे आहे.

त्यांच्या मते, एखादा फंड एखाद्या वर्षात अव्वल क्रमांकावर (mutual funds) असला तरी तो दीर्घकाळ सातत्याने चांगली कामगिरी करेलच असे नाही. अनेकदा असे घडते की एखादा फंड अल्पावधीत मोठा परतावा देतो, त्यामुळे त्यात गुंतवणूकदारांचा ओघ वाढतो आणि एयूएम झपाट्याने वाढते. परंतु बाजारातील चक्र बदलल्यावर त्या फंडाची कामगिरी मंदावू शकते. परिणामी, ज्यांनी केवळ अलीकडील परताव्यावर विश्वास ठेवून गुंतवणूक केली असते ते निराश होतात.
राधिका गुप्ता यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर (mutual funds) लिहिताना नमूद केले की, “१ वर्षाचा मागील परतावा चांगल्या गुंतवणुकीचा शत्रू ठरू शकतो.” त्यांच्या मते, बाजार हा चक्रीय असतो. तेजीच्या काळानंतर मंदी येते आणि प्रत्येक फंड सर्वच बाजारस्थितीत सारखी कामगिरी करेल असे नसते. त्यामुळे अल्पकालीन रँकिंगवर आधारित गुंतवणूक निर्णय दीर्घकालीन उद्दिष्टांना मारक ठरू शकतात.
त्या गुंतवणूकदारांना तीन, पाच किंवा दहा वर्षांच्या (mutual funds) रोलिंग रिटर्न्सकडे पाहण्याचा सल्ला देतात. रोलिंग रिटर्न्समुळे फंडाने वेगवेगळ्या कालावधीत आणि विविध बाजारस्थितीत कशी कामगिरी केली हे स्पष्ट होते. यामुळे फंडाच्या गुंतवणूक प्रक्रियेतील शिस्त, धोरणाची स्थिरता आणि जोखमीचे व्यवस्थापन किती मजबूत आहे याचा अधिक अचूक अंदाज येतो.
त्यांच्या मते, केवळ टॉप रँक किंवा अल्पकालीन (mutual funds) चमकदार आकड्यांकडे पाहून गुंतवणूक करणे म्हणजे अर्धवट माहितीवर निर्णय घेणे होय. दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी संयम, सातत्य आणि सखोल विश्लेषण या तत्त्वांवर भर द्यावा. अल्पकालीन नफ्याच्या मोहात पडण्याऐवजी दीर्घकालीन उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित केल्यासच खरी संपत्ती निर्माण होऊ शकते, असे त्यांनी अधोरेखित केले आहे.
हेही वाचा :
महेंद्रसिंह धोनीवर मोठा अन्याय, सत्य समजताच येईल संताप, खळबळजनक माहिती समोर!
मोठी बातमी! बीजेपीचा बांगलादेशमध्ये झेंडा, लोकसभेची एक जागा जिंकली