सेटवर सगळ्यांसोबत कशी वागते तेजश्री प्रधान? मालिकेतील भावाने सांगितला अनुभव; म्हणाला- अशी गोड दिसते पण ती खूप…

अभिनेत्री तेजश्री प्रधान हिचं नाव सध्या सगळ्यांच्या तोंडावर आहे.(series) त्याचं कारण म्हणजे तिची नवीन येणारी मालिका. तेजश्रीने ‘होणार सून मी ह्या घरची’ मधून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. पुढे ती ‘अग्गबाई सासूबाई’, ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत दिसली. मात्र तिने ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका मध्येच सोडली. त्यानंतर चाहत्यांना अनेक प्रश्न पडले होते. आता तेजश्री पुन्हा एकदा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे. नुकताच या मालिकेचा नवा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला. त्यात तेजश्री आणि तिच्या भावाचं नातं दाखवण्यात आलंय. आता तिच्या ऑनस्क्रीन भावाने तेजश्री सेटवर कशी वागते याबद्दल सांगितलं आहे.

‘वीण दोघातली ही तुटेना’ या मालिकेत अभिनेता राज मोरे तेजश्रीच्या भावाची भूमिका साकारतोय. त्याने नुकतीच एक मुलाखत दिली. यात तो तेजश्रीच्या सेटवरच्या वागण्याबद्दल बोललोय. तो म्हणाला, ‘आमच्या शूटला जास्त दिवस नाही झालेत, पण माझा आणि तेजश्री ताईचा ऑफस्क्रीन बॉण्ड खूप छान झाला आहे. ती एक कडक शिस्तीची आहे हे मला इतक्या दिवसात तिच्या सोबत काम करून कळलं आहे.(series) ती मला सांगते कि आपण असं करू म्हणजे सीन अजून फुलून येईल, ती तांत्रिकदृष्ट्या चांगला सल्ला देते. जसं कधी एखादा शब्द घ्यायचा असतो तर तिला तो छान सुचतो आणि त्याचा मलाही खूप फायदा होतो. मला एक परफेक्ट सीनियरप्रमाणे तेजश्री ताईचं मार्गदर्शन मिळतंय, ज्याचा एक कलाकार म्हणून खूप फायदाही होत आहे.’

तो पुढे म्हणाला, ‘तेजश्री ताई खात्री करते की फक्त तिचे कामच नाही तर आमच्या सर्वांचे कामही छान व्हायला हवं आणि त्यासाठी तिचे प्रयत्न असतात, कारण सगळं छान असेल तर शो भरभराटीला येईल. मालिकेच्या प्रोमोमध्ये दाखवले आहे की ती माझ्यासाठी लग्न करत आहे, आणि मालिकेत तुम्हाला ते बघायला मिळेल की काय हट्ट आहे जो मी तिच्याकडे करतो आणि तिला लग्न करावे लागत. (series)गोष्ट खूप सुंदर लिहली आहे आणि मी आवर्जून सांगेन की मालिका तुम्ही नक्की बघा. तेजश्रीताई कडून मिळालेला सल्ला आणि सहकार्य यामुळे टीममध्ये एक सकारात्मक ऊर्जा जाणवते.’ तेजश्री प्रधान व सुबोध भावे यांची नवीन मालिका प्रेक्षकांना आवडणार का हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे. ११ ऑगस्टपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा :

तुमचं खाते ‘या’ बँकेत आहे? मोठ्या बदलाची घोषणा
फुलांच्या जाळीदार साडीत जान्हवीचा ग्लॅमरस ‘परम सुंदरी’ अंदाज
इंग्लंड हादरलं! पाकिस्तानी खेळाडूवर महिलेवर अत्याचाराचे गंभीर आरोप