आयसीसीमहिला टी-20 विश्वचषक 2026 मध्ये अपेक्षित यश मिळवण्यात अपयशी ठरल्यानंतर आता भारतीय महिला क्रिकेट संघाचे लक्ष आशियाई क्रीडा स्पर्धेकडे लागले आहे. जपानमध्ये होणाऱ्या या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून, कर्णधारपदाची जबाबदारी कोणाकडे सोपवण्यात आली आहे, याकडे क्रिकेट चाहत्यांचे विशेष लक्ष लागले होते.

हरमनप्रीतवर पुन्हा विश्वास, संघात एकच बदल जपान मधील आयची-नागोया येथे 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबरदरम्यान आशियाई क्रीडा स्पर्धा पार पडणार आहे. 2023 मध्ये चीन मधील हांगझू येथे सुवर्णपदक जिंकलेल्या भारतीय महिला संघाकडे यावेळीही विजेतेपद कायम राखण्याचे आव्हान असणार आहे. पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटांमध्ये या स्पर्धेत टी-20 स्वरूपात क्रिकेटचे सामने खेळवले जाणार आहेत. इंग्लंड येथे नुकत्याच झालेल्या आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2026 मध्ये भारतीय संघाला गट टप्प्यातच गाशा गुंडाळावा लागला. ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या पराभवानंतर संघ स्पर्धेबाहेर पडला आणि (Indian women) त्यानंतर 37 वर्षीय हरमनप्रीत कौर यांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले.
मात्र विश्वचषकातील निराशाजनक कामगिरी असूनही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने हरमनप्रीत कौर यांच्यावर विश्वास कायम ठेवला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेल्या 15 सदस्यीय संघाचे नेतृत्व पुन्हा त्यांच्याकडेच सोपवण्यात आले आहे. स्मृती मंधाना उपकर्णधार म्हणून कायम राहणार आहे. विश्वचषकासाठी निवडलेल्या संघात केवळ एकच बदल करण्यात आला असून, यष्टीरक्षक-फलंदाज यास्तिका भाटिया हिला वगळून जी. कमलिनी हिला संधी देण्यात आली आहे. दुखापतीमुळे विश्वचषकाला मुकलेली अष्टपैलू श्रेयंका पाटील हिचाही संघात समावेश करण्यात आला असून तिचा सहभाग फिटनेसवर अवलंबून असेल. फलंदाजीत शेफाली वर्मा जेमिमा रॉड्रिग्स आणि रिचा घोष या हरमनप्रीतला साथ देणार आहेत, (Indian women) तर दीप्ती शर्मा , रेणुका सिंह , श्री चरणी अरुंधती रेड्डी आणि नंदिनी शर्मा यांच्यावर गोलंदाजीची जबाबदारी असेल.
विश्वचषकातील अपयशानंतर सुवर्णपदकाचे लक्ष्य महिला टी-20 विश्वचषक 2026 मध्ये भारताची कामगिरी मिश्र स्वरूपाची राहिली. पाकिस्तान , बांगलादेश आणि नेदरलँड्स यांच्याविरुद्ध संघाने विजय मिळवला, मात्र दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागल्याने उपांत्य फेरी गाठण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. (Indian women) त्यामुळे विश्वचषकातील मोहिम गट टप्प्यातच संपुष्टात आली.तरीही भारतीय संघासाठी एक सकारात्मक बाब म्हणजे स्पर्धेतील सर्वोच्च मानांकित आशियाई संघ म्हणून भारताने 2028 च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्रता निश्चित केली आहे. आता आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक कायम राखण्याचे मोठे लक्ष्य भारतीय संघासमोर असेल. या स्पर्धेसाठी भारतीय संघात हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, रिचा घोष, जी. कमलिनी, भारती फुलमाली , श्री चरणी, रेणुका ठाकूर , क्रांती गौड , अरुंधती रेड्डी, श्रेयंका पाटील, राधा यादव आणि नंदिनी शर्मा यांचा समावेश करण्यात आला आहे.
हेही वाचा :
मी बोलायला लागलो, तर सहन होणार नाही..!
महाबळेश्वरला जाताय तर सावधान पर्यटकांसाठी प्रसिद्ध पॉईंट बंद?
Jio आणि Airtel यूजर्स सावधान Gmail खात्याबाबतची ही चूक ठरू शकते धोकादायक?