विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी दोन भारतीय भाषा शिकणे बंधनकारक काय आहे नवा नियम?

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकणे बंधनकारक असणार असून, त्यापैकी किमान दोन भाषा भारतीय असणे आवश्यक असणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) २०२० अंतर्गत त्रिभाषा धोरणाच्या अंमलबजावणीसाठी ही नव्याने मार्गदर्शक तत्त्वे ‘सीबीएसई’ने जाहीर केली आहेत. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून या धोरणाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येणार आहेत.

सीबीएसईने स्पष्ट केले आहे की, विद्यार्थ्यांमध्ये भाषिक कौशल्य विकसित करणे, भारतीय भाषांचे संवर्धन करणे आणि भाषाशिक्षण अधिक प्रभावी बनवणे हा या धोरणाचा प्रमुख उद्देश आहे. विद्यार्थ्यांवर अतिरिक्त परीक्षांचा ताण टाकण्याऐवजी त्यांच्या भाषिक विकासाला चालना देण्यावर भर दिला जाणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये नववीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागतील. दोन भारतीय भाषा शिकणारे विद्यार्थी तिसरी भाषा म्हणून इंग्रजीसह अन्य (students) भाषा किंवा आणखी एक भारतीय भाषा निवडू शकतील. मात्र, एक भारतीय आणि एक परकीय भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा भारतीयच घ्यावी लागणार आहे.

सध्या नववीत शिकत असलेल्या आणि आधीपासून दोन भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष सवलत देण्यात आली आहे. (students) अशा विद्यार्थ्यांना त्यांची भाषा व्यवस्था कायम ठेवता येईल. मात्र, त्यांना अतिरिक्त भारतीय भाषा शिकावी लागेल. या अतिरिक्त भाषेचे मूल्यमापन शाळास्तरावर होईल आणि दहावीच्या बोर्ड परीक्षेत तिचा समावेश केला जाणार नाही. सध्या सातवी किंवा आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही अशीच सवलत देण्यात आली आहे. त्यांनाही एक अतिरिक्त भारतीय भाषा शिकावी लागेल; मात्र दहावीपर्यंत त्या भाषेची बोर्ड परीक्षा द्यावी लागणार नाही.

दिव्यांग विद्यार्थी, परदेशातील सीबीएसई शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच परदेशातून भारतात परतलेल्या विद्यार्थ्यांना भारतीय भाषा तिसरी भाषा म्हणून शिकण्यापासून सूट देण्यात आली आहे. तसेच पालकांच्या बदली किंवा स्थलांतराच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना पूर्वी निवडलेली तिसरी भाषा कायम ठेवण्याची मुभा देण्यात येणार आहे. (students) दरम्यान, २०२६-२७ मध्ये सहावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांपासून त्रिभाषा धोरणाची पूर्ण अंमलबजावणी सुरू होईल. हिंदी, मराठी, संस्कृत, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, बंगाली, गुजराती, पंजाबी, ओडिया आणि आसामीसह २२ अनुसूचित भाषा भारतीय भाषांमध्ये समाविष्ट असून इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश आणि अरबी या परकीय भाषा म्हणून गणल्या जाणार आहेत.

हेही वाचा :

मी बोलायला लागलो, तर सहन होणार नाही..!

महाबळेश्वरला जाताय तर सावधान पर्यटकांसाठी प्रसिद्ध पॉईंट बंद?

Jio आणि Airtel यूजर्स सावधान Gmail खात्याबाबतची ही चूक ठरू शकते धोकादायक?