राजधानी दिल्लीत घडलेल्या या प्रकारामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न एकदा ऐरणीवर आला आहे. ओळखीच्या व्यक्तीने मोमोज खाऊ घालण्याचे आमिष दाखवत गाडीतच लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप महिलेने लावला आहे.

ओळखीच्या व्यक्तीवर गंभीर आरोप करत महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली.घटनेचा महत्त्वाचा पुरावा पीडितेने स्वतः मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला.पोलिसांनी संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. देशात लैंगिक अत्याचाराचे प्रमाण वाढत असतानाच दिल्लीतून अशीच एक घटना समोर आली आहे. नसरापूर प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा झाली खरी पण अद्याप महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण काही कमी होण्याचे नाव घेत नाहीये. पूर्व दिल्लीतील मंडावली परिसरातून २४ वर्षीय महिलेवर चालू गाडीत बलात्कार झाल्याची घटना समोर येत आहे. महिलेने यासंबंधित पोलस ठाण्यात तक्रार दाखल केली असून धक्कादायक कारण देखील स्पष्ट केले आहे.महिलेने पोलिसांना आपल्या तक्रारीत सांगितले की, आरोपीने तिला मोमज खाऊ घालण्याच्या बहाण्याने गाडीतून बसवले. यानंतर CNG भरण्याच्या नावाखाली त्याने गाडी थांबवण्याचे वचन दिले. (capital) परंतु गाडी त्याने थांबवलीच नाही तर पुढे एका निर्जन रसत्यावरुन गाडीला वळवले. महिलेने पोलिसांना आपली व्यथा सांगत आरोपीवर अनेक आरोप लावले.
महिलेने आपल्या आरोप लावला की, आरोपी महिलेला गाडीत बसवून तिच्याशी अश्लिल संभाषण करु लागला. त्याने यासाठी महिलेवर दबाब देखील आणला. चुकीच्या पद्धतीने तो तिला स्पर्श करु लागला आणि नंतर गाडीतूनही महिलेला उतरु दिले नाही. महिलेने ही संपूर्ण घटना आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केली आणि नंतर हा पुरावा पोलिसांसमोर सादर केला. (capital) महिलेची तक्रार आणि हाती आलेल्या पुऱ्याव्याच्या आधारावर मंडावली पोलिसांनी बीएनएसच्या संबंधित कलमांनुसार आरोपीविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. पोलिस प्रकरणाचा तपास करत असून आरोपीला लवकरच अटक होण्याची आशा आहे.
दरम्यान मागील महिन्यातच पुणे शहरातूनही अशीच एक बातमी समोर आली होती. चालू गाडीत एका महिला वकीलासोबत लैंगिक अत्याचार करण्यात आले. या प्रकरणात पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली. यातच आता दिल्लीतूनही अशीच एक घटना समोर आली आहे. महिलेवर लैंगिक अत्याचार करणारा हा व्यक्ती तिच्या ओळखीतला असल्याची माहिती आहे. (capital) महिलेच्या आरोपानुसार, तो तिला मोमोज खायला नेतो असं सांगून गाडीत बसवून एका निर्जन ठिकाणी घेऊन गेला आणि तिथे महिलेचा गैरफायदा घेण्याचा त्याने प्रयत्न केला. मात्र, महिलेने संपूर्ण घटना आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड केल्यामुळे आरोपीचा डाव फसला आणि हे प्रकरण उघडकीस आले.
हेही वाचा :
मी बोलायला लागलो, तर सहन होणार नाही..!
महाबळेश्वरला जाताय तर सावधान पर्यटकांसाठी प्रसिद्ध पॉईंट बंद?
Jio आणि Airtel यूजर्स सावधान Gmail खात्याबाबतची ही चूक ठरू शकते धोकादायक?