धाड धाड कोसळले तेलाचे भाव, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती थेट?

इराण आणि अमेरिका युद्धानंतर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरताना दिसत आहेत. (petrol and diesel) सतत त्यात घसरण सुरू आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या स्वस्त होण्याचा अंदाज आहे.

मागील काही दिवसांपासून जागतिक बाजारात सतत कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी घसरण होताना दिसतंय. इराण आणि अमेरिका युद्धात कच्च्या तेलाचे भाव जागतिक बाजाराज सतत वाढताना दिसले. त्याचा परिणाम म्हणजे भारतात तब्बल चार वेळा केंद्र सरकारने ट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ केली. जागतिक बाजाराज कच्च्या तेलाचे दर कमी होत असतानाच आता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. इतर देशांमध्ये इराण आणि अमेरिका युद्धावेळी वाढलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्यात आल्यात. कच्च्या तेलाची निर्यात करणाऱ्या देशांची संघटना असलेल्या ‘ओपेक’ने उत्पादनात वाढ करण्याचे संकेत दिले आहेत. या घडामोडीनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती आणखी कमी झाल्या. मात्र, भारतातील सरकारी तेल कंपन्यांनी 3 जुलै 2026 रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये कोणतेही बदल केली नाहीत. 25 मे 2026 नंतर केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल करण्यात आले नाहीत.

5 राज्याच्या विधानसभा निवडणुकींमध्ये केंद्र सरकारने ज्यावेळी जागतिक बाजाराज कच्च्या तेलाच्या किमती गगणाला पोहोचल्या होत्या, त्यावेळी भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणतेही बदल केले नाहीत. (petrol and diesel) त्यामुळे कंपन्या दबावात होत्या. जर केंद्र सरकारने त्यावेळी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्या असत्या तर थेट निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता होती. त्यावेळी सरकारी तेल कंपन्यांनी घाटा सहन केला. आता जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर सतत घसरत आहेत. मात्र, तेल कंपन्यांकडून तो तोटा भरून काढण्याकरिता कोणत्याही प्रकारचे पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केले जात नाहीत. अजून काही दिवस तरीही लोकांना पेट्रोल आणि डिझेलसाठी जास्तच पैसे मोजावे लागतील.

पुढच्या आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. (petrol and diesel) मात्र, यावर केंद्र सरकारने कोणतेही भाष्य केले नाही. इराण आणि अमेरिका युद्धात तेल पुरवठ्याची साखळी विस्कळीत झाली. होर्मुज खाडी इराणने युद्धात बंद केली. आता अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धविराम करार पूर्ण झाली आहेत. मात्र, एकमेकांना धमक्या देणे अजूनही सुरूच आहे.

हेही वाचा :

शेतकऱ्यांनो कर्जमाफी यादीत नाव कसं तपासाल?

पीएफ खातेधारकांसाठी नवीन नियम, पेन्शनबाबतही मोठे बदल?

धाड धाड कोसळले तेलाचे भाव, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती थेट?