ड्रायव्हिंग लायसन्ससाठी नियम बदलणार बाईक, टॅक्सीसाठी १ ऑगस्टपासून अंमलबजावणीची शक्यता?

राज्यातील ड्रायव्हिंग लायसन्स प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी तसेच बाईक टॅक्सी सेवेला कायदेशीर चौकट उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. (transparent) ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी डोमिसाइल प्रमाणपत्र अनिवार्य करण्याबरोबरच बाईक टॅक्सी सेवेसाठी स्वतंत्र नियमावली लागू करण्याची तयारी सुरू असून, आवश्यक मंजुरीनंतर हे नियम १ ऑगस्टपासून लागू होण्याची शक्यता असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत मंगळवारी दिली.ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी भविष्यात राज्यातील अर्जदारांना डोमिसाइल (अधिवास) प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहणार आहे. हा नियम संपूर्ण महाराष्ट्रात लागू केला जाणार असून, यासंदर्भातील मसुदा सध्या कायदा व न्याय विभागाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. विभागाची मंजुरी मिळाल्यानंतर १ ऑगस्टपासून त्याची अंमलबजावणी सुरू होण्याची शक्यता आहे.

ड्रायव्हिंग लायसन्स देण्याची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, डोमिसाइल प्रमाणपत्रासाठी कोणती कागदपत्रे ग्राह्य धरली जाणार, याबाबत अद्याप अंतिम निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. (transparent) दरम्यान, राज्यात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या बाईक टॅक्सी सेवांचे नियमन करण्यासाठी सरकारने ‘महाराष्ट्र बाईक टॅक्सी नियम २०२५’ अंतर्गत नवे धोरण तयार केले आहे. या प्रस्तावित धोरणानुसार, बाईक टॅक्सी ऑपरेटरकडून दररोज ५ रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तसेच प्रत्येक प्रवासामागे २ रुपये अतिरिक्त शुल्क घेऊन ती रक्कम चालकांच्या कल्याण निधीत जमा केली जाणार आहे. या धोरणामुळे रोजगारनिर्मितीला चालना मिळण्याबरोबरच राज्याच्या महसुलात वाढ होईल आणि बाईक टॅक्सी व्यवसायाला नियमनबद्ध स्वरूप मिळेल, असा सरकारचा दावा आहे.

नवीन नियमांमध्ये महिला, विद्यार्थी आणि अल्पवयीन प्रवाशांच्या सुरक्षेला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. (transparent) त्यानुसार, बाईक टॅक्सी चालकाकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स आणि पब्लिक सर्व्हिस व्हेईकल (PSV) बॅज असणे अनिवार्य राहील. तसेच हा बॅज देण्यापूर्वी संबंधित चालकाची पोलीस पडताळणी करणेही बंधनकारक असेल.सरकारकडून या नियमांना अंतिम स्वरूप देण्याचे काम सुरू असून, आवश्यक प्रशासकीय मंजुरीनंतर १ ऑगस्टपासून ड्रायव्हिंग लायसन्स आणि बाईक टॅक्सी सेवेशी संबंधित नवे नियम लागू होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

इचलकरंजी बनली चिखलकरंजी नागरिक संतप्त महापौरांचे कामे थांबवण्याचे आदेश?

नृसिंहवाडीच्या दत्त मंदिरात दक्षिणद्वार सोहळा कृष्णामाई दत्तगुरूंच्या भेटीला भाविकांची स्नानपर्वणी?

E20 पेट्रोलमुळे गाडीचे इंजिन खराब होणार का?