इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करणारी पंचगंगा नदी सध्या पुरामुळे दुथडी भरून वाहत असताना दुसरीकडे शहरातील अनेक भागांमध्ये नागरिकांना नियमित पाणीपुरवठा मिळत नसल्याने संतापाची लाट उसळली आहे. (Panchganga) नदीकाठावरील परिसरात पाणी पोहोचले असतानाही नळांना पाणी नसल्याची विरोधाभासी परिस्थिती निर्माण झाली असून नागरिक प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांनी पूरग्रस्त भागांची पाहणी करून महापालिका प्रशासनाच्या नियोजनावर आणि सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली. “नदी पाण्याने भरून वाहत असताना शहरवासीयांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असेल, (Panchganga) तर ही प्रशासनाच्या नियोजनातील मोठी त्रुटी आहे,” असे त्यांनी म्हटले.
शहरातील विविध भागांमध्ये अनियमित पाणीपुरवठा, कमी दाबाने येणारे पाणी आणि वारंवार होणारा पुरवठा खंडित (Panchganga) यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. एकीकडे पूरस्थिती आणि दुसरीकडे पाणीटंचाईसारखी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
हेही वाचा :
इचलकरंजी बनली चिखलकरंजी नागरिक संतप्त महापौरांचे कामे थांबवण्याचे आदेश?
नृसिंहवाडीच्या दत्त मंदिरात दक्षिणद्वार सोहळा कृष्णामाई दत्तगुरूंच्या भेटीला भाविकांची स्नानपर्वणी?