पाठलाग करून शाळकरी मुलीची छेडछाड?

जत तालुक्यातील एका गावातील शाळकरी अल्पवयीन विद्यार्थिनीचा सातत्याने पाठलाग करून तिला चिठ्ठी देत छेडछाड (Schoolgirl) केल्याप्रकरणी दोन युवकांविरुद्ध पोक्सो कायद्यासह भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थिनी रोजप्रमाणे शाळेत ये-जा करत असताना संशयित तिचा वारंवार पाठलाग करत होते. सुरुवातीला तिच्याकडे पाहून इशारे करणे, तिच्या वाटेत उभे राहणे असे प्रकार सुरू होते. (Schoolgirl) त्यानंतर त्यांनी विद्यार्थिनीला चिठ्ठी देऊन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थिनीने प्रतिसाद न दिल्यानंतरही हा त्रास सुरूच राहिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या त्रासामुळे विद्यार्थिनी मानसिक तणावाखाली होती. अखेर तिने घडलेला प्रकार पालकांना सांगितला. (Schoolgirl) यानंतर कुटुंबीयांनी संबंधित पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली असता, प्रकरणात तथ्य आढळून आल्याने दोन्ही युवकांविरुद्ध पोक्सो कायद्यासह भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला.

हेही वाचा :

कमी वयात केस पांढरे होतायेत? 5 कारणे ठरू शकतात जबाबदार?

क्रिकेट विश्वात खळबळ इंग्लंड पराभवानंतर गंभीरसमोर ‘संजू’च्या घोषणा?

पंतप्रधान मोदींना इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान?