पाऊस पडायला लागला की, हमखास कांदा भजी खाऊया हे वाक्य प्रत्येकाच्या तोंडी येतं. पण कधी विचार केलाय का? पावसाळ्यातच कांदा भजी खावीशी का वाटतात? यामागे नेमके कारण काय, जाणून घ्या

गेले ५-६ दिवस महाराष्ट्रात सगळीकडे मुसळधार पाऊस पडतोय. अनेक ठिकाणी पावसाने झोडपले आहे. पण पाऊस पडायला लागला की, घरी असो वा ऑफिस असो सगळ्यांच्या तोंडून एकच वाक्य निघतं ते म्हणजे ‘मस्त पाऊस पडायला लागलाय आणि कांदा भजी खावीशी वाटतेय’ खरं आहे ना? पण कधी हा विचार केलाय का की पाऊस सुरू झाल्यानंतर कांदा भजीच का खावीशी वाटते? आता तुम्ही म्हणाल की, अरे हा विचार कधी केलाच नाही. पण पावसाळ्यात गरमागरम कांदा भजी खाण्यामागे हवामानातील बदलाबरोबरच मानसशास्त्रीय कारणेदेखील आहे. पावसाचं वातावरण आणि कांदा भजी हे आपल्याकडे जणू काही समीकरणच झालंय. (onion bhaji) पण त्यामागची मुख्य कारणं नेमके काय आहे ते आपण लेखातून समजून घेऊया आणि आम्ही केलेला व्हिडिओदेखील तुम्ही नक्कीच पाहू शकता. माधुरी दीक्षितने सांगितलेली कांदा भजीची रेसिपी नक्की बनवून पहा,भजी होतील कुरकुरीत
कांदा भजी खावीशी वाटण्यामागे कारण पावसाळ्यात बाहेरचे वातावरण थंड असते. अशा वेळी शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी आपल्याला गरम आणि उष्णता देणारे अन्न खावेसे वाटते आणि यात सर्वात आधी तळलेले गरमागरम पदार्थ डोळ्यासमोर येतात पावसामध्ये वातावरणात एक प्रकारचा मंदपणा असतो, (onion bhaji) ज्यामुळे आपला मूड कधीकधी आळसवाणा, उदास आणि कंटाळवाणा होऊ शकतो, ज्याला वैज्ञानिक भाषेत डोपामाईन म्हटलं जातं. पण अशावेळी गरम, मसालेदार आणि कुरकुरीत भजी खाल्ल्याने मेंदूत असणारे डोपामाइन नावाचे आनंदी संप्रेरक स्रवते, ज्यामुळे आपल्याला हायसे वाटते आणि थोडासा ताजेपणा येतो.
हेदेखील अजून एक कारण कुरकुरीत आणि चविष्ट भजी खाताना येणारा कुरकुरीत आवाज आणि तिखट-चमचमीत चव मनाला आणि जिभेला तृप्त करते अर्थातच आपल्या जिभेचे चोचले पुरवते हे काही वेगळं सांगायला नको.याशिवाय आपल्याकडे लहानपणापासूनच पावसाळ्यात भजी खाण्याची एक परंपराच झाली आहे. (onion bhaji) त्यामुळे पाऊस पडताच आपोआप चहा आणि भजीची आठवण येते आणि आपसुकच पाय स्वयंपाकघराकडे वळतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कांद्याचे आरोग्यदायी फायदे. कांद्यामध्ये असणारे घटक शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात आणि बेसन आपल्याला ऊर्जा देते. म्हणूनच पावसाळ्यात कांद्याची भजी करून खाल्ली जाते.
हेही वाचा :
कमी वयात केस पांढरे होतायेत? 5 कारणे ठरू शकतात जबाबदार?
क्रिकेट विश्वात खळबळ इंग्लंड पराभवानंतर गंभीरसमोर ‘संजू’च्या घोषणा?
पंतप्रधान मोदींना इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान?