८ वा वेतन आयोग येण्याआधीच कर्मचाऱ्यांच्या पगारात तब्बल दुपटीने वाढ?

पश्चिम बंगाल सरकारने आरोग्य आणि महिला-बाल विकास क्षेत्रात कार्यरत असलेल्या आशा आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी मोठा आर्थिक निर्णय जाहीर केला आहे. आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मासिक मानधनात भरीव वाढ करण्यात आली असून, (Anganwadi) नवीन दर 1 ऑगस्ट 2026 पासून लागू होणार आहेत. या निर्णयामुळे लाखो कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.

1 ऑगस्टपासून वाढीव मानधन लागू राज्य सरकारने जारी केलेल्या अधिकृत आदेशानुसार, मान्यताप्राप्त आशा सेविकांचे निश्चित मासिक मानधन 6,250 रुपयांवरून थेट 11,250 रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहे. ही रक्कम त्यांच्या कामगिरीनुसार मिळणाऱ्या प्रोत्साहनपर मानधनाव्यतिरिक्त असेल. त्यामुळे आशा सेविकांच्या एकूण उत्पन्नात यापूर्वीपेक्षा मोठी वाढ होणार आहे. (Anganwadi) याचबरोबर एकात्मिक बाल विकास सेवा अंतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांनाही वाढीव मानधनाचा लाभ मिळणार आहे. नवीन निर्णयानुसार अंगणवाडी सेविकांना दरमहा 14,000 रुपये, तर मदतनीसांना 11,800 रुपये मानधन दिले जाणार आहे.

ग्रामीण आणि शहरी भागात माता व बाल आरोग्य, लसीकरण, पोषण अभियान आणि सार्वजनिक आरोग्य सेवा प्रभावीपणे राबविण्यात या कर्मचाऱ्यांची महत्त्वाची भूमिका असते. मानधनवाढीची त्यांची दीर्घकालीन मागणी या निर्णयामुळे पूर्ण झाली आहे.अर्थसंकल्पातून निधीची तरतूद सरकारने स्पष्ट केले आहे की, वाढीव मानधनासाठी लागणारा खर्च राज्याच्या अर्थसंकल्पातील संबंधित तरतुदींमधून करण्यात येणार आहे. या प्रस्तावाला वित्त विभागाची मंजुरी मिळाली असून आवश्यक निधी वेळेवर वितरित केला जाईल. त्यामुळे वाढीव मानधनाची अंमलबजावणी कोणत्याही विलंबाशिवाय 1 ऑगस्टपासून सुरू होईल, असेही सरकारने नमूद केले आहे

.हा निर्णय थेट आठव्या वेतन आयोगाशी संबंधित नसला तरी तळागाळातील कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्याच्या दिशेने सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलल्याचे मानले जात आहे. (Anganwadi) नव्या निर्णयानुसार आशा सेविकांना दरमहा 11,250 रुपये, अंगणवाडी सेविकांना 14,000 रुपये आणि अंगणवाडी मदतनीसांना 11,800 रुपये मानधन मिळणार आहे. या वाढीमुळे त्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होणार असून कामाचे मनोबलही उंचावण्यास मदत होईल.

हेही वाचा :

कमी वयात केस पांढरे होतायेत? 5 कारणे ठरू शकतात जबाबदार?

क्रिकेट विश्वात खळबळ इंग्लंड पराभवानंतर गंभीरसमोर ‘संजू’च्या घोषणा?

पंतप्रधान मोदींना इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान?