‘तारक मेहता’मधून जाणार आणखी एक चेहरा? अभिनेत्याचा मोठा खुलासा!

गेल्या अनेक दिवसांपासून ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतील अनेक कलाकार मालिका सोडत आहेत. अशातच आता आणखी एक कलाकार (Artist)मालिका सोडणार असल्याची चर्चा सुरु आहे. तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. यामधील वेगवेगळी पात्रे ही प्रेक्षकांची प्रचंड आवडची आहेत. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनामध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. ही मालिका 2008 पासून सुरु झाली आहे. ही मालिका असित मोदी निर्मित आहे.

मात्र, गेल्या काही महिन्यांपासून या मालिकेतील काही कलाकार मालिका सोडत असल्याचा बातम्या समोर येत आहेत. अशातच आता ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतील अनेकांचे आवडता असणारा कलाकार(Artist) मालिका सोडणार असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, या मालिकेतील काही कलाकारांनी मालिका सोडली आहे. या मालिकेत जेठालाल, अंजली भाभी, भिडे मास्तर, माधवी भाभी, हाथी भाई, टप्पू सेना, मेहता साहब, चंपक चाचा, बाघा आणि पोपटलाल अशी सगळी पात्रे आहेत. सध्या ही मालिका एक वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.

सध्या जरी ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत असली तरी ती आता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. आतापर्यंत या मालिकेतील अनेक कलाकारांनी वेगवेगळ्या कारणांमुळे ही मालिका सोडली आहे. या मालिकेतील अनेक पात्रे बदलण्यात देखील आली आहे. अशातच आता या मालिकेतील प्रसिद्ध कलाकार मालिका सोडणार आहे. याआधी कलाकारांनी मालिकेचे निर्माते असित मोदींवर गंभीर आरोप करत मालिका सोडली आहे. आता जेनिफर मिस्त्री बन्सीवालने एका मुलाखतीत असित मोदींनी त्रास दिल्याचे म्हटलं आहे.

फिल्मीग्यान’ला दिलेल्या मुलाखतीत या मालिकेत बाघाची भूमिका साकारणारा अभिनेता तन्मय वेकारियाने मालिका सोडण्याबाबतच्या अफवांबद्दल वक्तव्य केलं आहे. तो म्हणलाा की, ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका सोडण्याचा मी कधी स्वप्नातही विचार करू शकत नाही. परंतु, एक काळ असा होता की मी या मालिकेतील अभिनय सोडण्याचा विचार केला होता.

पुढे तो म्हणला की, मी एक शोमध्ये काम करत होते. तो शो अचानक बंद झाला. त्यानंतर मला चार महिने काम मिळालं नाही. त्यावेळी मी 9 ते 5 या वेळेत अभिनय सोडून नोकरी करावी असा विचार केला होता. मात्र, मला त्यावेळी ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. तेव्हापासून आतापर्यंत असे काही घडले नाही की मालिका सोडावी. या मालिकेतील माझा प्रवास खूप सुंदर आहे. त्यामुळे मी कधीही ही मालिका सोडणार नाही.

हेही वाचा :

शेअर बाजार, तज्ज्ञांनी वर्तवला अंदाज! हे स्टॉक्स गुंतवणूकदारांसाठी ठरू शकतात फायदेशीर
शुभमन गिलची चूक ठरली महागात, मोठा फटका बसला!
महायुती घटक पक्षातील इनकमिंग आणि आगामी निवडणुका !