भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात असून यातील चौथा सामना बुधवार 23 जुलै पासून मँचेस्टरमध्ये खेळवला जातोय. या सामन्याचा टॉस इंग्लंडने जिंकला आणि प्रथम गोलंदाजी निवडली. यावेळी पहिल्या दिवशी टीम इंडियाने(Team India) 264 धावांवर 4 विकेट गमावले.

दरम्यान 68 व्या ओव्हरला टीम इंडियाचा स्टार फलंदाज ऋषभ पंतला गंभीर दुखापत झाली. वेदनेने कळवळत आणि रक्तबंबाळ अवस्थेत त्याला मैदानाच्या बाहेर नेण्यात आलं. आता टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी बीसीसीआयच्या सूत्रांकडून पंतच्या दुखापतीवर मोठी अपडेट दिली आहे.
टेस्ट सामन्याच्या पहिल्या दिवशी ऋषभ पंतच्या उजव्या पायावर बॉल लागल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतच्या उजव्या पायाच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झालं असून तो ही सीरिज पुढे खेळू शकणार नाही. सूत्रांच्या माहितीनुसार ऋषभला डॉक्टरांनी जवळपास दीड महिना आरामाचा सल्ला दिला आहे. जवळपास ६ आठवडे पंतला क्रिकेटपासून दूर रहावे लागेल. यामुळे टीम इंडियाला(Team India) मोठा धक्का बसलाय, कारण पंत हा इंग्लंड सीरिजमध्ये चांगल्या फॉर्मात होता त्याने पहिल्या सामन्यात दोन शतक सुद्धा ठोकली होती. तेव्हा ऋषभ पंतच्या जागी कोणाला संधी दिली जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
भारताचा कर्णधार शुभमन गिल हा अवघ्या 12 धावा करून बाद झाला तेव्हा भारताची धावसंख्या 3 विकेटवर 140 धावा अशी होती. तेव्हा उपकर्णधार ऋषभ पंत(Team India) मैदानात आला आणि त्याने साई सुदर्शन सोबत पार्टनरशिप करत भारताची धावसंख्या 200 पार पोहोचवली. ऋषभ पंतने यावेळी 48 बॉलमध्ये 37 धावा केल्या. मात्र 68 व्या ओव्हरचा चौथा बॉल इंग्लंडचा गोलंदाज ख्रिस वोक्सने टाकला. यावेळी पंत स्ट्राईकवर होता. या बॉलवर पंतने रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केला आणि तो बुटावर फ्लश झाला.
एलबीडब्ल्यूसाठी मोठी अपील इंग्लंडने केली. मात्र नॉट आउटचा निर्णय अंपायरने दिला. मात्र यावेळी पंतच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्याच्या पायाला उजव्या पायावर मोठी सूज आली आणि थोडं रक्तही आलं होतं. तो त्यावर उभा राहू शकत नव्हता. गंभीर दुखापतीमुळे तो तो उभाही राहू शकत नव्हता आणि पुढे खेळू शकणार नव्हता यावेळी त्याला रिटायर्ड हर्ट म्हणून घोषित करून त्याला मैदानाबाहेर पाठवण्यात आलं.

फिजिओ आणि इतर खेळाडूंच्या मदतीने त्याला मैदानाबाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु पंतला चालता येत नव्हतं तेव्हा त्याला बाहेर काढण्यासाठी एक छोटी रुग्णवाहिका बोलवण्यात आली. गाडीमधून जाताना सुद्धा पंत वेदनेने थरथर कापत आहे. पंत रिटायर्ड हर्ट होऊन बाहेर पडल्याने त्याच्या जागी रवींद्र जडेजाला मैदानात फलंदाजीसाठी बोलवण्यात आलं. ऋषभ पंतला यापूर्वी देखील दुसऱ्या सामन्यादरम्यान विकेटकिपिंग करताना हाताला दुखापत झाली होती. त्यामुळे लॉर्ड्स टेस्टमध्ये तो विकेटकिपिंग करताना दिसला नाही. आता पुन्हा पंतला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे.
BCCI कडून ऋषभ पंतच्या दुखापतीवर निवेदन जाहीर करण्यात आलं आहे. त्यात म्हटलं आहे, ‘मँचेस्टर कसोटीत पहिल्या दिवशी फलंदाजी करत असताना ऋषभ पंतच्या उजव्या पायाला दुखापत झाली. त्याला पुढील तपासणीसाठी स्कॅनसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आहे. बीसीसीआयची वैद्यकीय टीम त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे’.
हेही वाचा :
वयाने लहान मुलांना Date का करत आहेत मुली? रिलेशनशिप सिक्रेटचा खुलासा
AI गिळून टाकणार ‘या’ लोकांची नोकरी! ChatGPT च्या मालकांनी सांगितले कारण
प्राजक्तासोबत सेल्फी घेण्यासाठी चाहत्याचे नको ते धाडस, Video व्हायरल