BMC निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का

मुंबई : राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. याबाबत सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला असून येत्या चार महिन्यांमध्ये पालिकांच्या निवडणुकींचा(politcial news)बिगुल वाजणार आहे. यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुंबई महापालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी शिवसेनेसह सर्व पक्ष प्रयत्न करत आहेत. दरम्यान, ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. कौटुंबिक संबंध असलेल्या तेजस्वी घोसाळकर शिवसेना ठाकरे गटाला राम राम केला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरे गटाला गळती लागली आहे. अनेक नेत्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. यानंतर आता त्यांनी आणखी एक धक्का बसला आहे. ठाकरे कुटुंबाशी जवळचे नाते असलेल्या तेजस्वी घोसाळकर यांनी देखील पक्षाची साथ सोडली आहे. स्थानिक नेतृत्वाबद्दल त्यांच्या मनामध्ये नाराजी होती. यामुळे त्यांनी शिवसेना ठाकरे गटामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

माजी नगरसेवक तेजस्वी घोसाळकर या माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आहेत. अभिषेक घोसाळकर यांची फेसबुक लाईव्ह सुरु असताना हत्या करण्यात आली होती. या प्रकरणामुळे राज्यभरातून प्रतिक्रिया उमटत होत्या. तेजस्वी घोसाळकर या शिवसेना(politcial news) उबाठामधील ज्येष्ठ नेते विनोद घोसाळकर यांच्या सून आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, तेजस्वी घोसाळकर भाजपमध्ये किंवा शिंदे गट शिवसेनेत सामील होऊ शकतात.

तेजस्वी घोसाळकर यांनी व्हॉट्सअपद्वारे विभागप्रमुखांकडे राजीनामा सादर केला आहे. यांनी दिलेल्या राजीनाम्यात म्हटले की, मी तेजस्वी घोसाळकर महिला – दहिसर विधानसभा प्रमुख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), या पदावरून वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत आहे. या पदावर कार्य करताना मला पक्षाच्या कार्यपद्धतीशी एकनिष्ठ राहून कार्य करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी पक्षप्रमुख व आपले मन:पूर्वक आभार मानते. माझा हा राजीनामा स्वीकारावा, ही नम्र विनंती. दरम्यान, शिवसेनेचे वरिष्ठ नेते तेजस्वी घोसाळकर यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

माजी नगरसेवक तेजस्वी घोसाळकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. मागील महिन्यामध्ये त्यांना व्हॉट्सअपद्वारे धमकी देण्यात आली होती. तेजस्वी घोसाळकर यांच्या नावाने व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज शेअर करण्यात आला होता. ‘लालचंद इनको देखकर सुधर जा, इसकी बिवी को मत मरवा देना लालचंद’, अशा आशयाचा हा मेसेज होता. त्यानंतर आता तेजस्वी घोसाळकर यांनी ठाकरे गटाचा राजीनामा दिला आहे. त्या लवकरच शिंदे गटामध्ये प्रवेश करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरु आहे.

हेही वाचा :

आनंदाची बातमी! 48 तासांत सोन्याच्या दरात 2 हजारांची घसरण

17 मे पासून पुन्हा रंगणार IPL चा थरार; पाहा संपूर्ण शेड्यूल; या दिवशी होणार फायनल

‘या’ जिल्ह्यांना वादळी पाऊस अन् गारपिटीचा इशारा, सतर्कतेसाठी IMD कडून अलर्ट जारी