शाहरुखचा ‘रईस’ चित्रपट पाहून हत्या! मोबाईलवर बनवला ‘हत्येचा संपूर्ण व्हिडिओ’

चित्रपट बघायला सगळ्यांनाच आवडत, चित्रपटामध्ये हिरो किंवा हिरोईन जसे कपडे किंवा स्टाईल करतात तसे आपल्याला सुद्धा करायला आवडत. चित्रपटामधील गाण्यावर जसे अभिनेते नाचतात तसे आपण सुद्धा करून बघतो. परंतु मध्यप्रदेश मध्ये असं काही घडलं आहे ते ऐकून तुम्हाला धक्काच बसेल. शाहरुख खानचा चित्रपट ‘रईस’ मित्रांनी मिळून बघितला आणि त्याला प्रभावित झाले. त्यांनी चित्रपटातील दृश्याची नक्कल करत आपला मित्र अभिषेक त्रिपाठी याचा चाकूने(Murder) गळा कापला आणि संपूर्ण घटना कॅमेऱ्यात रेकॉर्ड केली.

७ मे रोजी अभिषेकच्या कुटुंबीयांना एक व्हिडीओ पाठवण्यात आला, ज्यामध्ये एक तरुण अभिषेकचा गळा कापतांना दिसत होता(Murder). व्हिडिओमध्ये दुसरा एक व्यक्ती त्याला म्हणाला होता, “मोबाईल फेकू का?” आणि तो मोबाईल तिथेच फेकतो. ही हत्या एखाद्या सिनेमाच्या स्टाईलने शूट करण्यात आली होती. आरोपींना हा खून ‘क्लासिक गँगस्टर स्टाईल’मध्ये दाखवायचा होता, ज्याप्रमाणे ‘रईस’ चित्रपटात दाखवले आहे.

अभिषेकला आरोपींनी १५ किलोमीटर दूर भौखरी कला गावातील जंगलात बोलावले. तिथे आधीपासून उपस्थित असलेल्या दोन अल्पवयीन मेंढपाळांना धमकावून पळवून लावण्यात आले आणि नंतर अभिषेकला जंगलात आत नेऊन लाठीने मारले. त्यानंतर आरोपी म्हणाले, बाकीचे पैसे हवेत का? आजच हिशोब करूया….

त्यानंतर मुख्य आरोपी रजनीश मिश्रा याने अभिषेकला पशूप्रमाणे जमिनीवर आपटून चाकूने गळा कापायला सुरुवात केली(Murder), तर त्याचा साथीदार राजकुमार ही संपूर्ण घटना रेकॉर्ड करत होता. आरोपी रजनीशने हा व्हिडिओ आपला भाऊ गोलू मिश्रा याला पाठवला, जेणेकरून तो आपली ‘बहादुरी’ दाखवू शकेल. गोलूने हा व्हिडिओ कुलदीप त्रिपाठीला दाखवला. कुलदीपने तो व्हिडिओ आपल्या कुटुंबीयांना दाखवला आणि त्यांच्यामार्फत ही माहिती अभिषेकच्या कुटुंबापर्यंत पोहोचली. त्यानंतर कुटुंबीय थेट पोलीस स्टेशनला गेले आणि त्यांनी तो व्हिडिओ दाखवला, जो पाहून पोलीसही थक्क झाले.

यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक विवेक लाल यांच्या मते, तीन आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि त्यांची कसून चौकशी सुरु आहे. या प्रकरणाचा तपास आता सायबर सेल आणि मानसशास्त्रीय तज्ज्ञांच्या मदतीने पुढे नेला जात आहे. यामागचं कारण असं की ही हत्या कोणत्याही सामान्य वैमनस्यातून घडलेली नसून चित्रपटापासून प्रेरित मनोरुग्ण विचारसरणीचा परिणाम असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा :

BMC निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का

स्था. स्व. संस्था निवडणुका जे राज्यात, तेच कोल्हापुरात राजकीय प्रवाह बदलले

‘या’ जिल्ह्यांना वादळी पाऊस अन् गारपिटीचा इशारा, सतर्कतेसाठी IMD कडून अलर्ट जारी