मोठी बातमी! पंढरपुरात वशिवल्याचे दर्शन बंद, श्री विठ्ठल मंदिर समितीचा निर्णय

पंढरपुरातून भाविकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. श्री विठ्ठल मंदिर(temple ) समितीने वशिल्याने आधी दर्शन नावाचा प्रकार बंद करण्याचा घेतला आहे. याची आजपासूनच अंमलबाजवणी केली जाणार आहे. या निर्णयामुळे सामान्य भाविकांना दर्शन लवकर आणि सुलभपणे मिळणार आहे. या निर्णयामुळे भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

दर्शन रांगेतील भाविकांना जलद गतीने आणि सोयीस्कररित्या विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन व्हावं, यासाठी हा महत्वपूर्ण निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. वारकरी संप्रदायामधून या निर्णयाचे स्वागत केले आहेत. विठुरायाच्या मंदिरात दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. जवळपास एक लाखापेक्षा जास्त भाविक पंढरपूरमध्ये येत असल्याचं स्पष्ट झालंय. ते दर्शन रांगेतून विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतात.

यावेळी अनेकांना वशिल्याचे दर्शन घडविले जाते. यामुळे दर्शन रांग मोठ्या प्रमाणात रखडते. रांगेतील भाविक तासनतास ताटकळत उभे राहतात. हीच बाब मंदिर समितीच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी वशिल्याचे दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी थेट परिपत्रकच काढले आहे. आषाढी यात्रेच्या अनुषंगाने पंढपुरात आतापासून भाविकांची गर्दी वाढली आहे. सामान्य भाविक मंदिर समितीच्या या निर्णयाचं स्वागत करीत आहेत.

जर मंदिर(temple ) समितीच्या कर्मचाऱ्यांनी वशिल्याचे दर्शन दिल्याचा प्रकार समोर आला तर, त्या संबंधित कर्मचाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा परिपत्रकातून देण्यात आलाय. मंदिर समितीचे सहअध्यक्ष, सदस्य आणि कार्यकारी अधिकारी यांच्या परवानगीशिवाय कोणालाही मंदिरात दर्शनासाठी सोडले जाणार नाही, असा लेखी आदेशच कार्यकारी अधिकाऱ्यांनी काढलाय. परंतु मंदिराच्या सदस्यांना यामधून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे सदस्यांना देखील वशिल्याचे दर्शन देता येणार नाही, असा ठोस निर्णय मंदिर समितीने घेण्याची मागणी वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी केलेली आहे.

हेही वाचा :