चंद्रहार पाटलांचं अखेर ठरलं! शक्तिप्रदर्शन करत करणार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.(enter ) उद्या संध्याकाळी 5 वाजता ठाण्यातील नेहरू नगर परिसरात पक्षप्रवेश होणार आहे. यानंतर एकनाथ शिंदेंकडून चंद्रहार पाटलांना मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह राज्यपाल नियुक्त विधान परिषदेवरील आमदारकीसंदर्भात सुद्धा चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

या पक्षप्रवेशावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. श्रीकांत शिंदे, खा. नरेश म्हस्के, खा. धैर्यशील माने, सांगलीतील स्थानिक आमदार सुहास बाबर, मंत्री उदय सामंत,मंत्री संजय शिरसाट, मंत्री शंभूराज देसाई, मंत्री प्रकाश आबिटकर,मंत्री प्रताप सरनाईक हे नेते उपस्थितीत राहणार आहेत.शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करताना चंद्रहार पाटील मोठं शक्तिप्रदर्शन करणार आहेत. त्यानंतर ते 5000- 7000 कार्यकर्त्यांसह शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत. यामुळे मंत्री उदय सामंत आणि स्थानिक आमदार सुहास बाबर यांच्या प्रयत्नांना यश आलं आहे. दरम्यान, यामुळे उद्धव ठाकरे यांना यामुळे मोठा धक्का बसला आहे.

चंद्रहार पाटलांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी पोस्टमध्ये, ‘राज्यातील क्रीडा क्षेत्रामध्ये काम करत असताना, बऱ्याच त्रुटी, अडचणी, गैरप्रकार मी अनुभवलेले आहेत. अशा बाबींविरुद्ध मी वेळोवेळी आवाज देखील उठवला आहे. परंतु प्रत्यक्ष शासन सहभागाशिवाय असे प्रश्न मार्गी लागणे कठीण आहे. (enter )म्हणून क्रीडा क्षेत्रामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी व सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करण्यासाठी, मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी सरकार सोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे.’ असं म्हटलं आहे.

2024 सालच्या लोकसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेने चंद्रहार पाटील यांना सांगली या मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. या जागेसाठी काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यात चांगलीच रस्सीखेच झाली होती. शेवटपर्यंत दोन्ही पक्षांनी ही जागा मिळवण्यासाठी प्रयत्न केला होता.(enter ) शिवसेना माघार घेण्यास तयार नसल्याचे समजल्यानंतर शेवटी काँग्रेसने एक पाऊल मागे घेत ही जागा ठाकरेंना दिली होती. ही जागा जिंकण्यासाठी ठाकरेंनी चांगलीच ताकद लावली होती. मात्र चंद्रहार पाटलांना फक्त 55 हजार मतं मिळाली होती.

याच मतदारसंघातून काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी तयारी केली होती. शेवटी पक्षाने तिकीट न दिल्यानं ते अपक्ष म्हणून उभे राहिले होते. त्यांनी तब्बल पाच लाख 69 हजार मतं मिळवत चंद्रहार पाटील तसेच भाजपाचे उमेदवार संजयकाका पटील यांना धूळ चारली होती. आता ज्या चंद्रहार पाटलांसाठी ठाकरेंनी ताकत पणाला लावली होती, आता तेच एनकाथ शिंदे यांच्या भेटीला गेल्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

हेही वाचा :