शरद पवारांना मोठा धक्का? ‘जयंत पाटलांना भाजपात घेण्याचा निर्णय…’, बड्या नेत्याचं सूचक विधान

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (political issue)प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भारतीय जनता पार्टीच्या वाटेवर आहेत की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरु आहे. या चर्चेला कारण ठरत आहे भाजपाचे मंत्री आणि माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेलं एक विधान. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करत चंद्रकांत पाटलांनी जयंत पाटलांच्या भाजपा प्रवेशासंदर्भात सूचक विधान केलं आहे.

जयंत पाटलांच्या भाजप(political issue) पक्षप्रवेशाच्या चर्चा सुरु असण्यावरुन चंद्रकांत पाटलांना शुक्रवारी पत्रकारांनी प्रश्न विचारला. याच चर्चांवरून चंद्रकांत पाटलांनी स्पष्टीकरण दिलं आहे. सांगलीमधील मिरज येथे पत्रकारांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटलांनी, जयंत पाटलांना भाजपामध्ये घेण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीसच घेतील असं म्हटलं आहे. तसेच असा निर्णय झाला तर ते काय करणार हे सुद्धा चंद्रकांत पाटलांनी यावेळी सांगितलं.

“जयंत पाटलांना भाजपात घेण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीसच घेतील. तसा निर्णय झाला तर जयंत पाटलांकडे पहिले आपणचं जाऊ आणि त्यांना भाजपात या म्हणू! मात्र देवेंद्र फडणवीस असा निर्णय करतील अशी कोणतीही शक्यता आज दिसत नाही,” अश्या शब्दात भाजपाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी म्हटले.

चंद्रकांत पाटलांनी(political issue) दिलेल्या या उत्तरामुळे गेल्या काही महिन्यांपासून जयंत पाटील भाजपात जाणार या चर्चेचा पूर्णविराम दिला आहे. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दूरदृष्टीचे नेते आहेत. त्यांच्या मनात काय चाललंय हे कोणालाही कळत नाही,” असे देखील चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केले आहे.

“जयंत पाटील भाजपात येण्याचे अप्लीकेशन आलं का?” असा सवाल चंद्रकांत पाटलांनी केलेल्या या विधानावरुन प्रश्न विचारला असता शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांना केला. तसेच पुढे बोलताना, ” ॲडमीशन मागीतलीच नाही तर याचा प्रश्नच येतो कुठे?” असा खोचक टोलाही सुप्रिया सुळेंनी लगावला.

दरम्यान, दुसरीकडे हिंदी सक्तीविरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी 5 जुलै रोजी मुंबईत मोर्चाचं आवाहन केलं असतानाच जयंत पाटलांनी या आंदोलनामध्ये शरद पवारांचा पक्ष सहभागी होईल असं पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून जाहीर केलं आहे. “राज्य सरकार महाराष्ट्रात जी हिंदी सक्ती लादू इच्छित आहे त्याविरोधात दिनांक 5 जुलै 2025 रोजी मुंबईतील गिरगाव चौपाटीवरून मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. प्रत्येक मराठी माणसाने या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन मी करत आहे,” अशी पोस्ट जयंत पाटलांनी केली असून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून तसं पत्र जारी केल्याचा फोटोही पोस्ट केलाय.

हेही वाचा :

सिंधू पाणी करार : पाकिस्तानला पुन्हा मोठा दणका!

राज-उद्धव एकत्र… शरद पवारांचा बिनशर्त पाठिंबा! 

बिग बॉस फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचं आकस्मिक निधन! रुग्णालयाबाहेरील Video समोर