सलमान खान याचा अलिकडील एका कार्यक्रमातील लुक पाहून त्याच्या चाहत्यांच्या काळजात धस्स झाले होते.आता बिग बॉसचा नवा सिझन Bigg Boss 20 चा ट्रेलर लाँच झाल्यानंतर आता सलमान खान या शोचा होस्ट असणार की नाही याविषयी उत्सुकता ताणली आहे.

बिग बॉस टीव्ही शोचा नवा सिझन Bigg Boss 20 लवकरच दाखल होणार आहे. (Salman Khan) या शोचा होस्ट देखील अभिनेता सलमान खान हाच असणार असल्याचे संकेत मिळाले आहे. मनोरंजन, सस्पेन्स आणि इमोशन ड्रामा या सर्वांचा अर्क असलेल्या बिग बॉसच्या घरात यंदा नव्या सिझनमध्ये कोणते कलाकार असणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. जिओ हॉटस्टारने इंस्टाग्रामवर या पॉप्युलर रियालिटी शो Bigg Boss 20 चा ट्रेलर आणि लोगो आज प्रदर्शित केल्याने उत्सुकता वाढली आहे. सलमान खान याचा अलिकडे एका कार्यक्रमातील लूक चर्चेत असतानाच आता नव्या बिग बॉस सिझनमध्ये देखील तो होस्ट असणार असल्याचे म्हटले जात आहे.
बिग बॉस रियालिटी टीव्ही शोचा नवा सिझन Bigg Boss 20 चा ट्रेलर आज जिओ हॉटस्टारने रिलीज केला आहे. कलर्स वाहिनी आणि जिओ हॉटस्टार प्रायोजक असलेल्या या रियालिटी शोच्या नव्या सिझनचा डोळा असलेला लोगो बदलण्यात आला आहे. या डोळ्याच्या लोगोत आता मल्टी कलर्सचा पॅटर्न वापरण्यात आला आहे. बिग बॉसच्या मेकर्सने अद्यापपर्यंत बिग बॉसच्या अधिकृत प्रिमियरची तारीख गुपित ठेवली आहे. त्यांनी केवळ नवा शो परत येत आहे एवढेच कन्फर्म केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या नव्या बिग बॉस Bigg Boss 20 सिझनचा होस्ट सलमान खान हाच असणार आहे. (Salman Khan) त्यामुळे सलमान याच्या चाहत्यांसाठी मोठी पर्वणी आहे.
हेही वाचा :
झिम्बाब्वेविरुद्धचा सामना कुठे पाहता येणार? योग्य माहिती जाणून घ्या?