ब्रेकिंग न्यूज केंद्र सरकारने बोलावले संसदेचे विशेष अधिवेशन

सोमवार, ३० नोव्हेंबर २०२६ रोजी लोकसभेचे आणि बुधवार, २ डिसेंबर २०२६ रोजी राज्यसभेचे अधिवेशन बोलावण्याची विनंती केली आहे. कामकाजाच्या मागणीनुसार, (Rajya Sabha) दोन्ही सभागृहांचे कामकाज ३ डिसेंबर २०२६ रोजी संपू शकते, असं त्यांनी म्हटलं आहे.

दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी ही घोषणा केली. (Rajya Sabha) तातडीचे शासकीय कामकाज करण्यासाठी सरकारने लोकसभेचे अध्यक्ष आणि राज्यसभेच्या सभापतींना सोमवार, ३० नोव्हेंबर २०२६ रोजी लोकसभेचे आणि बुधवार, २ डिसेंबर २०२६ रोजी राज्यसभेचे अधिवेशन बोलावण्याची विनंती केली आहे. कामकाजाच्या मागणीनुसार, दोन्ही सभागृहांचे कामकाज ३ डिसेंबर २०२६ रोजी संपू शकते, असं त्यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे, या घोषणेनंतर काँग्रेसने आगामी संसदीय अधिवेशनासाठी आपली रणनीती ठरवण्यासाठी शुक्रवारी दिल्लीत सायंकाळी ४:३० वाजता आपल्या संसदीय समितीची बैठक बोलावली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, या बैठकीत पक्षाची भूमिका आणि आगामी अधिवेशनाच्या तयारीवर चर्चा केली जाईल.

मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणि महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीवर सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर ही प्रस्तावित संसदीय बैठक होत आहे. पीटीआय बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही या विषयावर चर्चा झाली आणि पंतप्रधानांनी मंत्र्यांना आगामी संसदीय बैठकीची तयारी करण्याचे निर्देश दिले. (Rajya Sabha) त्यामुळे या अधिवेशनात नेमकं काय घडणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. महत्त्वाचं म्हणजे, पावसाळी अधिवेशन पूर्णपणे संपले नव्हते. ते तहकूब करण्यात आले होते. पावसाळी अधिवेश अनिश्चित काळासाठी तहकूब होऊन ९८ दिवस झाले आहेत. दरम्यान, विरोधी पक्ष अधिवेशन पुन्हा सुरू करण्याची मागणी करत आहे. इतके दिवस उलटूनही अधिवेशन तहकूब न झाल्याने हा इतिहासातील एक नवीन विक्रम आहे. आतापर्यंत, तहकूब न होता अधिवेशनाचा विक्रम ८७ दिवसांचा होता, जो २००८ मध्ये नोंदवला गेला होता.

हेही वाचा : 

शेतकऱ्यांसाठी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची महत्वाची घोषणा, 20 लाख

जळगाव जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता गडद

जुगारात हरला कर्जबाजारी झाला अन् दुचाकी चोरल्या