हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे ढगफुटी झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.(pilgrims) किन्नौर कैलास ट्रेक मार्गावर दोन तात्पुरते पूल वाहून गेल्याने शेकडो यात्रेकरू अडकले होते. प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांनी तत्काळ कारवाई करत ‘झिपलाइन’च्या साहाय्याने ४१३ यात्रेकरूंची सुरक्षित सुटका केलीये.

पूल वाहून गेल्याने यात्रेकरू अडकले बुधवारी सकाळी टँगलिंग नाल्यावरील पूल पावसाच्या जोरदार प्रवाहात वाहून गेला. जिल्हा प्रशासनाला यात्रेकरू अडकले असल्याची माहिती मिळताच, इंडो-तिबेटीयन सीमा पोलिस आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दल यांनी संयुक्त बचाव मोहीम सुरू केली.
हिमाचलमध्ये ३४ जण बेपत्ता; मृतांची संख्या दहावर, एनडीआरएफ, झिपलाइनद्वारे सुटकाबचाव मोहिमेसाठी ITBP ने गिर्यारोहण आणि दोरी बचाव तंत्रज्ञानाचा वापर केला. (pilgrims) गिर्यारोहण बूट, दोरी, हार्नेस यांसारखी विशेष साधने वापरून यात्रेकरूंना एक-एक करून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. ने या मोहिमेचे दृश्य सोशल मीडियावरही शेअर केले असून, यात यात्रेकरूंना झिपलाइनने सुरक्षिततेकडे जाताना पाहता येते.
मान्सूनमुळे राज्यात प्रचंड हानीराज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्याअहवालानुसार, 20 जून ते 5 ऑगस्ट 2025 दरम्यान मुसळधार पावसामुळे राज्यात 194 मृत्यू झाले असून सुमारे 1.85 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. यापैकी 108 मृत्यू थेट पावसामुळे झालेल्या पूर, भूस्खलन आणि ढगफुटीच्या घटनांशी संबंधित आहेत.

हिमाचलमध्ये ढगफुटीने पुन्हा नुकसान’; आसपासच्या चार गावांतील शेती, पूल वाहून गेले रस्ते आणि पाणीपुरवठ्यावर परिणाम सध्या हिमाचल प्रदेशात 446 रस्ते,(pilgrims) 360 वीज वितरण ट्रान्सफॉर्मर आणि 257 पाणीपुरवठा योजना विस्कळीत आहेत. NH-305, NH-003 आणि NH-05 या तीन राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक अद्याप पूर्णपणे सुरळीत सुरु नाहीये. या दुर्घटनेमुळे खासगी मालमत्तेचे नुकसान 97,129.91 लाख रुपये, तर सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान 63,341.15 लाख रुपये इतके असल्याचा अंदाज आहे.
हेही वाचा :
कसोटी निवृत्तीनंतर विराट कोहलीचा नवा अंदाज! फोटो पाहून चाहते झाले भावूक
फक्त पैशांसाठी वैष्णवीचा जीव घेतला! पिंपरीत पुन्हा एक हुंडाबळीचा प्रकार समोर
IOCL मध्ये अप्रेंटिस पदांसाठी भरती; दक्षिण विभागात नोकरीची मोठी संधी!