बारुईपूर प्रकरणातील आरोपी पोलीस एन्काऊंटरमध्ये मारला गेला आहे. सीन रिक्रिएशनसाठी नेण्यात आलं असता त्याने पोलिसांवर वार करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तो गंभीर जखमी झाला. रुग्णालयात नेलं असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं.

पश्चिम बंगालमधील बारुईपूर इथं अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्येतील मुख्य आरोपी प्रभाष मंडल याचा बुधवारी पहाटे पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला. गुन्ह्याचं रिक्रिएशन करण्यासाठी पोलीस पथक आरोपीला घटनास्थळी नेत असताना त्याचा एन्काऊंटर करण्यात आला. मध्यरात्री पोलीस पथकाने गुन्ह्याच्या रिक्रिएशनसाठी आरोपीला घटनास्थळी नेलं होतं. (police) याचवेळी आरोपीने अचानक एका पोलिसाचं शस्त्र हिसकावून घेतलं आणि पोलीस पथकावर गोळी झाडली. त्याने घटनास्थळावरून पळून जाण्याचाही प्रयत्न केला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. प्रत्युत्तर देताना पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आरोपी गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने बारुईपूर रुग्णालयात नेलं असताना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. या घटनेनंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
4 जुलै रोजी बेपत्ता झालेली मुलगी सोमवारी पश्चिम बंगाल पोलिसांनी दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील बारुईपूर इथं एका 12 वर्षीय मुलीवरील बलात्कार आणि हत्येप्रकरणी मुख्य आरोपीला अटक केली. पोलिसांनी शोधमोहीम राबवून त्याला शहरातील बाजारपेठ परिसरातून पकडलं. यामुळे या प्रकरणातील अटकेची एकूण संख्या तीन झाली आहे. (police) या प्रकरणाच्या तपासासाठी सहा सदस्यीय विशेष तपास पथक स्थापन करण्यात आलं आहे. पीडित मुलगी ही 4 जुलै रोजी बेपत्ता झाली होती. एका मैत्रिणीसाठी भेटवस्तू खरेदी करण्यासाठी ती घराबाहेर गेली होती. जेव्हा मुलगी घरी परतली नाही, तेव्हा तिच्या कुटुंबीयांना पोलिसांत हरवल्याची तक्रार दाखल केली. नंतर रविवारी, सूर्यपूर हाट परिसरातील एका तलावात तिचा मृतदेह सापडला. तिच्या डोक्यावर जखमा होत्या.
आरोपीने तिच्यावर बलात्कार करून तिला जिवंतपणी तलावात फेकलं होतं, असं शवविच्छेदनातून उघड झालं. पाण्यात बुडाल्याने आणि अतिरक्तस्रावामुळे तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये संताप उसळला होता. संतप्त गावकऱ्यांनी बारुईपूर-जयनगर रस्ता अडवला, टायर जाळले आणि पोलिसांच्या वाहनांची तोडफोड केली होती. (police) बेपत्ता मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर काही तासांतच या गुन्ह्यात सहभागी असल्याच्या संशयावरून संतप्त जमावाने एका व्यक्तीला मारहाण करून ठार केलं. नंतर त्याची ओळख इंद्रजित मंडल अशी पटली. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची पोलीस अधीक्षक कार्यालयात भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांना सांगितलं की, तक्रार दाखल झाल्यानंतर तपासात एक टक्का जरी हलगर्जीपणा आढळला, तर कठोर कारवाई केली जाईल.
हेही वाचा :
इचलकरंजी बनली चिखलकरंजी नागरिक संतप्त महापौरांचे कामे थांबवण्याचे आदेश?
नृसिंहवाडीच्या दत्त मंदिरात दक्षिणद्वार सोहळा कृष्णामाई दत्तगुरूंच्या भेटीला भाविकांची स्नानपर्वणी?