मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा केली. (farmers) यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची पहिली यादी उद्या जाहीर होणार असल्याचेही सांगितले.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मोठी अपडेट समोर आली आहे. राज्यात 30 जुलैच्या आत कर्जमाफी मिळेल, अशी चर्चा होती. (farmers) त्यानंतर राज्य सरकारने कर्जमाफीच्या दिशेने मोठं पाऊल टाकलं आहे. कर्जमाफीबाबत मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे. कर्जमाफीची पहिली यादी उद्या जाहीर होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या घोषणने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर मोठं भाष्य केलं. दिवंगत अजितदादांच्या जयंतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘लाडके उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांची उद्या जयंती आहे. या निमित्ताने अतिशय सुंदर असं चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे, ज्यात दादांचं जीवन पाहायला मिळतंय. त्यांची कारकीर्द या निमित्ताने पाहायला मिळतेय. दादांचा उमदा स्वभाव, त्यांच हास्य त्यांची कठोरता हे सगळं यानिमित्ताने पाहायला मिळत आहे’.
नवी दिल्लीतील आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांवर टीका केली. ‘कुठलंही आंदोलन असलं की, काही चुकीच्या प्रवृत्ती आंदोलनात शिरत असतात आणि आपला स्वार्थ साधत असतात. दिल्लीतल्या आंदोलनात अनेक राजकीय पक्ष आणि संघटना आपापले हेतू साध्य करून अराजकता माजवण्याचा प्रयत्न करतात. दिल्लीतील आंदोलन हे चेहराहीन होते. (farmers) त्यामुळे ते भरकटलं. आंदोलकांनी पोलिसांच्या गाड्या फोडल्या, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले. पोलिसांनी वेळीच सगळं कंट्रोल केलं नसत तर अनर्थ घडला असता. मी सगळ्या आंदोलनावर आरोप करत नाही. काही लोक चांगल्या भावनेनेही करत असतील, पण काही लोकांना अराजकता माजवण्याचा हेतू असतो’,
सदाभाऊ खोत यांनी आंदोलकांना दहशतवाद्यांची उपमा दिली. त्यावर त्यांनी म्हटलं की, ते काय बोलले, ते मला माहीत नाही’. आंदोलनावर म्हणाले, ‘काही लोक चांगल्या भावनेने करत असतात. काही लोक स्वार्थ साधत असतात. सगळे एका दिशेने जाणारे नसतात. काही जणांना नीट पण माहीत नाही. हवसे नवसे गवसे असेही काही पक्ष आहेत. ज्यांना त्यांच्या-त्यांच्या राज्यात लोकांनी रिजेक्ट केलेलं आहे, असेही पक्ष यातून काही साध्य होईल का, ते पाहत असतात’. तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘आता शक्यता आहे की, उद्याच दादांच्या जयंतीचं औचित्य साधून कर्जमाफीच्या पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्याचा प्रयत्न करत आहोत. यासाठी बाबासाहेब पाटील तयारी करत आहे’.
हेही वाचा :
केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होणार शिंदेंच्या वाट्याला किती मंत्रिपदे येणार?
सुप्रिया सुळेंच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट डॉक्टरांनी दिला ‘व्हॉइस रेस्ट’चा सल्ला?