9 किलो वजन घटलं, सोनम वांगचुक यांची प्रकृती चिंताजनक,डॉक्टरांनी दिला मोठा इशारा?

विविध मागण्यांसाठी राजधानी दिल्लीतील जंतर-मंतर येथे 28 जूनपासून आमरण उपोषणाला(health)बसलेले पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची प्रकृती चिंताजनक झाली आहे. त्यांची प्रकृती आता “अत्यंत गंभीर” आहे, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. एवढंच नव्हे तर, त्यांचं हे उपोषण आणखी लांबलं, तर शरीरातील महत्त्वाच्या अवयवांवर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो, असंही वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. दरम्यान, देशभरातील विरोधी पक्षांचे नेते, सामाजिक संस्था, कलाकार आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी वांगचुक यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन केलं आहे. मात्र, सरकारकडून ठोस आश्वासन किंवा निर्णय मिळेपर्यंत उपोषण सोडणार नसल्याची भूमिका वांगचुक यांनी कायम ठेवली आहे. कोणताही ठोस प्रतिसाद मिळायच्या आधीच उपोषण मागे घेतल्यास चुकीचा संदेश जाईल, असं त्यांचं म्हणणं आहे.

डॉक्टरांचा इशारा काय ?
जूनपासून सुरू असलेल्या उपोषणामुळे (health)आतापर्यंत वांगचुक यांचं वजन 9 किलोहून अधिक कमी झाले आहे. सध्या त्यांचे वजन 56.9 किलोवर आले आहे. त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथकाकडून चोवीस तास लक्ष ठेवले जात आहे. डॉ. लाम्बा यांच्या मते, शरीराने प्रथम ग्लुकोजचा, त्यानंतर साठवलेल्या चरबीचा ऊर्जा निर्मितीसाठी वापर केला. आता हा साठाही जवळपास संपल्याने शरीराने ऊर्जा मिळवण्यासाठी स्नायूंचे विघटन सुरू केले आहे, असं ते म्हणाले. मात्र ही स्थिती कायम राहिल्यास त्यांचं हृदय, मूत्रपिंड, यकृत यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांवर परिणाम होऊ शकतो आणि परिस्थिती अधिक गंभीर बनू शकते, असा इशारा त्यांनी दिला.

शरीरात नेमकं काय घडतंय?
दीर्घकाळ अन्न न मिळाल्यास शरीर सर्वप्रथम ग्लुकोजचा वापर करते. त्यानंतर शरीरात(health) साठवलेली चरबी ऊर्जा म्हणून वापरली जाते. हा साठाही संपल्यावर शरीर स्नायूंचे विघटन करून ऊर्जा मिळवण्यास सुरुवात करते.

डॉक्टरांच्या माहितीनुसार, वांगचुक(health) यांच्या शरीरातील कीटोनचे प्रमाण 3+ पर्यंत पोहोचले होते. पुरेसे पाणी दिल्यानंतर ते 2+ वर आले असले, तरी ही स्थिती अजूनही चिंताजनक आहे. तसेच, युरिक अॅसिडची पातळीही वाढलेली असून, शरीर ऊर्जा मिळवण्यासाठी स्नायूंचा वापर करत असल्याचे हे लक्षण असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

वैद्यकीय पथकाने इशारा दिला आहे की, उपोषण आणखी काळ सुरू राहिल्यास शरीरातील महत्त्वाच्या अवयवांचे कार्य बाधित(health) होण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे वांगचुक यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून, प्रत्येक क्षण महत्त्वाचा ठरत आहे.

दिल्ली हायकोर्टासही चिंता
वांगचुक यांच्या खालावणाऱ्या प्रकृतीचं प्रकरण आता दिल्ली उच्च न्यायालयापर्यंत(health) पोहोचलं आहे. प्रत्येक नागरिकाचा जीव मौल्यवान आहे आणि त्यांना शक्य ती सर्व वैद्यकीय मदत मिळेल याची खात्री करणे हे सरकारचे कर्तव्य आहे असं निरीक्षण सुनावणीदरम्यान न्यायालयाने नोंदवलं. वांगचुक यांची दररोज वैद्यकीय तपासणी करण्याचे आणि गरज भासल्यास त्वरित उपचार पुरवण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने प्रशासनाला दिले. नियमित आरोग्य तपासणी करण्यास सरकारला कोणतीही हरकत नसल्याचं केंद्र आणि दिल्ली सरकारच्या वतीने बाजू मांडताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनीही सुनावणीदरम्यान सांगितलं.

उपोषण संपवण्यास नकार
दिवसेंदिवस(health) प्रकृती खालावत असूनही वांगचुक माघार घेण्यास तयार नाहीत. पुढील काही दिवसांत माझ्या जीवाला तात्काळ धोका निर्माण होईल अशी काही माझी तब्येत नाही, असं ते एका व्हिडीोत म्हणाले. आपल्याला अशक्तपणा आणि स्नायूंची झीज जाणवत असल्याचे त्यांनी मान्य केले, मात्र आपलं हृदय आणि शरीरातील महत्त्वाचे अवयव अजूनही योग्यरित्या कार्यरत असल्याचेही त्यांनी नमूद केले. आपण आणखी काही दिवस उपोषण सुरू ठेवू शकतो, असा ठाम विश्वास वांगचूक यांनी व्यक्त केला.

तसंच माझं उपोषण थांबवण्यावर भर देण्याऐवजी 20 जुलै रोजी(health) नियोजित असलेल्या ‘जंतर-मंतर ते संसद’ या मोर्चाला यशस्वी करण्यावर लक्ष केंद्रित करावं, असं आवाहन वांगचूक यांनी लोकांना केलं

हेही वाचा :

पेट्रोल डिझेल स्वस्त झालं की महाग? वाचा आजचे लेटेस्ट रेट?

कोल्हापूरच्या पर्यटनाला मिळणार नवी दिशा?

अन्न व औषध प्रशासनाचा धाडींचा सपाटा?