गोकुळ दूध संघाची निवडणूक चर्चेत होती. या निवडणुकीनंतर महायुतीला मोठा धक्का बसला. त्यातच शासनाने थेट 5 संचालक गोकुळ दूध संघावर नेमल्याने खळबळ उडाली. (Gokul Milk) त्यातच सतेज पाटलांनी अत्यंत मोठा आरोप केला.
गोकुळ संघावर राज्य सरकारने 5 संचालक नेमल्याने मोठी खळबळ उडाली. गोकुळच्या निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का बसला. थेट सतेज पाटलांनी या निवडणुकीत धमाका केला. महायुतीमधील अंतर्गत गटबाजीचा मोठा फटका बसल्याचे सांगण्यात आले. गोकुळचा विषय थेट कोर्टात पोहोचला आहे. (Gokul Milk) मात्र, त्यापूर्वीच थेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय झाला आणि सतेज पाटलांचा सर्व गेमच सरकारने पालटून टाकला. गोकुळ संघ ताब्यात घेण्याचा हा सरकारचा डाव असल्याचा आरोप सतेज पाटीलांनी केला. विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांवर मंत्री हसन मुश्रीफ यांनी जोरदार टीका केली. या 5 स्वीकृत सदस्यांना सहकारी संस्थांवर मतदानाच्या अधिकारही देण्यात आला आहे. ज्यानंतर मोठी खेळी झाली. गोकुळच्या मुद्द्यात घडामोडी घडताना दिसत आहेत.

गोकुळच्या एकून 25 जागांपैकी 12 जागांवर महायुती आणि 13 जागांवर सतेज पाटील यांचे पॅनेज विजयी झाले. मात्र, अध्यक्षपदाच्या निवडीसाठी आवश्यक असलेल्या 14 चा कोरम पूर्ण न करता आल्याने निवड होऊ शकली नाही. महायुतीने आणि समविचारी पॅनेलने कोणताही दगाफटका टाळण्यासाठी आपल्या 12 संचालकांना सहलीला पाठवले.
महायुतीचे 12 संचालक हे अलिबागमध्ये असल्याचे सांगितले जाते. सतेज पाटील कोल्हापूरमध्येच आहेत पण त्यांचे बारीक लक्ष इतर घडामोडींवर आहे. महायुतीच्या सर्व गोष्टींवर त्यांचे लक्ष आहे. संचालक कुठे आहेत काय नाही, (Gokul Milk) याची सर्व माहिती आपल्याकडे असल्याचे सतेज पाटील यांनी म्हटले. सतेज पाटील यांनी नुकताच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी म्हटले की, महायुतीचे 12 संचालक गोवा, सूरत असा प्रवास करून उदयपूरला पोहोचले आहेत.
ते आलिबागला गेल्याची माहिती सांगितले जात होती. पण ते उदयपूरच्या मॅरिएट हॉटेलमध्ये आहेत. मला सगळ्या रूमचे नंबर देखील माहिती आहेत. सगळेजण पहिल्या मजल्यावर असून 130 पासून त्यांचे रूम नंबर आहेत. सगळ्यांकडून प्रतिज्ञापत्रावर सह्या देखील घेतल्या आहेत, असे सतेज पाटील यांनी म्हटले. महायुतीचे संचालक अलिबागला असल्याची चर्चा होती. पण सतेज पाटलांनी सांगितले की, हे सर्वजण नक्की कुठे आहेत.
हेही वाचा :
मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाला गती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज दुधाच्या दरात ४ रुपयांनी वाढ कुठे घेतला निर्णय