शॉकिंग 13 तासांचे शूटिंग करून घरी परतताना अभिनेत्याचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

टीव्ही मनोरंजन विश्वातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. ‘आरंभी’ या मालिकेत ज्युनिअर कलाकार म्हणून काम करणारे संजीब सिंह यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. तब्बल १३ तासांचे शूटिंग पूर्ण करून घरी परतत असताना पेट्रोल पंपावर त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर टीव्ही इंडस्ट्रीमध्ये हळहळ व्यक्त केली जात (entertainment) असून, कलाकारांच्या कामाच्या तासांबाबतही पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

शूटिंग संपल्यानंतर घडली दुर्दैवी घटना फिल्म फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज चे सरचिटणीस अशोक दुबे यांनी या घटनेची माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, मुंबईतील साकीनाका येथील एसजे स्टुडिओमध्ये ‘आरंभी’ मालिकेचे शूटिंग सुरू होते. संजीब सिंह यांची शिफ्ट दुपारी २ वाजता सुरू झाली होती आणि रात्री ३ वाजेपर्यंत ते सलग शूटिंग करत होते.शूटिंगदरम्यान त्यांना काहीसा त्रास जाणवत असल्याचे त्यांनी सहकाऱ्यांना सांगितले होते. थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर त्यांनी पुन्हा काम सुरू केले आणि पॅकअपनंतर घरी जाण्यासाठी निघाले.

पेट्रोल पंपावर अचानक कोसळले रात्री शूटिंग संपल्यानंतर घरी जाताना वाटेत पेट्रोल भरण्यासाठी ते एका पेट्रोल पंपावर थांबले. (entertainment) याच ठिकाणी त्यांची प्रकृती अचानक खालावली आणि ते बेशुद्ध पडले. त्यांना तातडीने मदत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, प्राथमिक माहितीनुसार त्यांना आलेल्या तीव्र हृदयविकाराच्या झटक्यात त्यांचा मृत्यू झाला.यानंतर त्यांचे पार्थिव मुंबईतील कूपर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांचे पार्थिव कार्गो विमानाद्वारे कोलकात्याला पाठवण्यात आले. FWICE नेही त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत केली आहे.

३० वर्षे मनोरंजन क्षेत्रात केले काम संजीब सिंह हे मूळचे कोलकात्याचे रहिवासी होते. त्यांनी लग्न केले नव्हते. (entertainment) त्यांच्या पश्चात भाऊ आणि बहीण असा परिवार आहे. दोघेही सध्या कोलकात्यात राहतात. गेल्या जवळपास ३० वर्षांपासून ते मनोरंजन क्षेत्रात ज्युनिअर कलाकार म्हणून कार्यरत होते आणि आपल्या कुटुंबाचा आर्थिक भार सांभाळत होते. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या बहिणीचा घटस्फोट झाला असून भाऊही आजारी आहे. त्यामुळे कुटुंबासाठी संजीब सिंह हेच प्रमुख आधार होते. त्यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, टीव्ही इंडस्ट्रीतही शोककळा पसरली आहे.

हेही वाचा :

कमी वयात केस पांढरे होतायेत? 5 कारणे ठरू शकतात जबाबदार?

क्रिकेट विश्वात खळबळ इंग्लंड पराभवानंतर गंभीरसमोर ‘संजू’च्या घोषणा?

पंतप्रधान मोदींना इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान?