उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुजरात दाैऱ्यावर आहेत. त्यांच्या या दाैऱ्याकडे राज्याच्या नजरा आहेत. (Eknath Shinde)त्यातच आता मोठी माहिती पुढे येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती पुढैे येतंय.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुजरातच्या दाैऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात एकनाथ शिंदे सहभागी झाले होते. यादरम्यानच मोठी बातमी पुढे येतंय. एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने एकनाथ शिंदे वडनगरहून अहमदाबादला बाय रोड जाणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या दाैऱ्याकडे राज्याच्या नजरा आहेत. संजय राऊत यांनी यावर टीका केली. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी एकनाथ शिंदे गेले. अमित शाह यांच्या खांद्याला खांदा लावून एकनाथ शिंदे कार्यक्रमात सहभागी होताना दिसले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यातच वडोदरा येथे मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात जाणारे एकनाथ शिंदे राज्यातील पहिले नेते आहेत. त्यांनी मोदींना अनोख्या प्रकारे शुभेच्छा दिल्या आहेत. हेच नाही तर आज राज्यातील जवळपास वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर शिंदेंनी मोदींना शुभेच्छा देणाऱ्या जाहिराती दिल्या.
फक्त सामना सोडता सर्वच वृत्तपत्रामध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडून नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या जाहिराती देण्यात आल्या. वडोदरा येथे जाऊन मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाषणही शिंदेंनी दिले. अमित शाह मुंबईत दाखल झाल्यानंतर शिंदे त्यांच्या भेटीला पोहोचले होते. दोघांनी जवळपास अर्धा तास एकाच गाडीतून प्रवासही केला.
एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्यातील जवळीकता चर्चेचा विषय ठरली आहे. हेच नाही तर मध्यंतरी सांगितले जात होते की, देवेंद्र फडणवीस केंद्रात जातील आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्याची जबाबदारी असणार आहे. मात्र, मी राज्यातच राहणार असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यातच मोदींच्या गुजरातीमधील कार्यक्रमात एकनाथ शिंदे सहभागी झाले आहेत. अमित शाह यांच्यासोबत गुजरातच्या कार्यक्रमात हजेरी लावताना एकनाथ शिंदे दिसले.
हेही वाचा :
महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुका कधीपर्यंत होणार संभाव्य तारखा आल्या समोर?
नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास १९ सप्टेंबरपासून सुरू होणार?