मनोज जरांगे पाटील यांनी मागच्या 20 दिवसांपासून सुरु असलेलं आमरण उपोषण आंदोलन मागे घेतलं आहे. त्यानंतर आता यावर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. मनोज जरांगे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आला आहे.

मागच्या 20 दिवसांपासून सुरु असलेलं आमरण उपोषण आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी मागे घेतलं. सरकारच्यावतीने राधाकृष्ण विखे पाटील, प्रसाद लाड आणि दादा भुसे यांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. (Manoj Jarange) त्यानंतर काही अटींवर मनोज जरांगे पाटील यांनी माघार घेतली. मनोज जरांगे यांनी आता तीन महिन्यांचा 90 दिवसांचा अवधी दिला आहे. मीडियासमोर सरकारच्या प्रतिनिधींशी चर्चा करताना मनोज जरांगे पाटील यांनी इतर समाजांना कसे आरक्षण मिळते, पण मराठ्यांवर कसा अन्याय होतो हे प्रखरपणे मांडलं. “मनोज जरांगेंनी परत एकदा समाजाचा विश्वासघात केला आहे. रात्रीच्या अंधारात सरकार बरोबर साटंलोट केलं. मोठी सेटलमेंट केलेली आहे. मोठमोठ्या बाता मारणारा मनोज जरांगे आता का मागे हटला?” अशा शब्दात ओबीसी आंदोलक मंगेश ससाणे यांनी टीका केली.
“मराठा समाजाने आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. याच्या 15 ते 20 दिवसाच्या आंदोलनामध्ये तीन मराठा बांधवांचा जीव गेला आहे. त्याला जबाबदार कोण?” असा सवाल ससाणे यांनी विचारला. “सरकार ओबीसी आंदोलकांवर कारवाई करते, याला कधी बेड्या घालणार? मनोज जरांगेंनी सातत्याने शिवीगाळ करून माता, माऊलींच्या भावना दुखावल्या आहेत, (Manoj Jarange) याच्यावर गुन्हा दाखल करायलाच लावणार” असं मंगेश ससाणे म्हणाले.
“मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा पोपट कधीच मेलेला होता. पण या पोपटाला खतपाणी देऊन, दाणे टाकून मोठं करण्याचं काम महाराष्ट्रातल्या काही नेतेमंडळींनी केलं. जरांगेंच्या बेकायदा मागणीला कायमच आमदार, खासदार सपोर्ट करत राहिले. (Manoj Jarange) त्यामुळे मनोज जरांगे हा सरकारच्या मानगुटी वरती बसला होता. त्यामुळे हे भूत एकदा मानगुटीवरुन खाली उतरायचं. मनोज जरांगे नावाचा पोपट हा कधीच संपलेला होता. मी मुंबईला गेलो तर आपल्याला कोणीही भीख घालणार नाही, या भीतीपोटी मनोज जरांगे याने हे आंदोलन मागे घेतले आहे. मी यापूर्वीही सांगितलं होतं जरांगे मुंबईला जाणार नाही” असं लक्ष्मण हाके म्हणाले.
हेही वाचा :
महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुका कधीपर्यंत होणार संभाव्य तारखा आल्या समोर?
नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास १९ सप्टेंबरपासून सुरू होणार?