अभिजीत दिपके आक्रमक पोलिसांवर केले अत्यंत गंभीर आरोप?

दिल्ली येथील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या नीट पेपरफुटीविरोधातील आंदोलनादरम्यान CJP चे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांवर तीव्र टीका केली. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या (Abhijeet Deepke) राजीनाम्याच्या मागणीवर ठाम राहत त्यांनी आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही दिला.

जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान अभिजीत दिपके यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही पद सोडावे, अशी मागणी त्यांनी केली. आजची तरुण पिढी कोणत्याही दबावाला किंवा भीतीला बळी पडणारी नसल्याचा दावा करत त्यांनी सरकारवर विद्यार्थ्यांना घाबरवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.बिहार मध्ये काही विद्यार्थ्यांना अटक झाल्याचा उल्लेख करत त्यांनी राज्य सरकारला इशारा दिला. आंदोलक विद्यार्थ्यांवर कारवाई करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा उलट परिणाम होईल आणि अधिकाधिक विद्यार्थी रस्त्यावर उतरतील, असे त्यांनी म्हटले. (Abhijeet Deepke) तसेच धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचे स्पष्ट करत 20 जूनच्या मोर्चापेक्षाही मोठा मोर्चा काढण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

दिल्ली पोलिसांच्या कामकाजावरही अभिजीत दिपके यांनी कठोर शब्दांत टीका केली. पोलिसांच्या वर्तनाबद्दल नाराजी व्यक्त करत त्यांनी वादग्रस्त भाषेत त्यांच्यावर निशाणा साधला. आंदोलनात सहभागी असलेल्या काही सहकाऱ्यांनी संदेश पाठवून पोलिस (Abhijeet Deepke) त्यांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या घरी जाऊन त्रास देत असल्याची माहिती दिल्याचा दावा त्यांनी केला.याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अशा प्रकारची कारवाई तातडीने थांबवावी, अशी मागणी करत त्यांनी इशारा दिला की, आंदोलनकर्त्यांना त्रास देणे सुरूच राहिल्यास दिल्ली पोलिस मुख्यालयासमोरही आंदोलन छेडले जाईल. एकदा आंदोलन सुरू केल्यानंतर ते सहज मागे हटत नाहीत, असे सांगत त्यांनी सरकार आणि दिल्ली पोलिस दोघांवरही पुन्हा एकदा टीकेची झोड उठवली. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आपण ठाम असल्याची भूमिकाही त्यांनी यावेळी पुनरुच्चारित केली.

हेही वाचा :

झिम्बाब्वेविरुद्धचा सामना कुठे पाहता येणार? योग्य माहिती जाणून घ्या?

आमदार नारायण कुचे यांच्या कारचा भीषण अपघात ३ जण गंभीर जखमी?

मग अट्टहास कशासाठी केला?