कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
भारताच्या इतिहासात एक तुघलक होऊन गेला. तो एका प्रांताचा राजा होता. पण तो मनाला येईल तेव्हा चलन बदलायचा. राजधानी बदलायचा. कोणतेही निर्णय घेऊन ते पुन्हा रद्द करायचा. कंटाळलेली प्रजा त्याला वेडा तुघलक म्हणायची. बलाढ्य अमेरिकेचे दुसऱ्यांदा अध्यक्ष बनवलेले डोनाल्ड ट्रम्प हे 21 व्या शतकातले दुसरे वेडा तुघलक म्हणून ओळखले जातात. (Tughlaq) आता त्यांना मध्यावधी निवडणुकीत तेथील जनतेने शक्तीहीन केले आहे. सिनेट आणि प्रतिनिधी गृहात त्यांचा रिपब्लिकन पक्ष अल्पमतात येऊन डेमोक्रॅटिक पक्षाने बहुमत प्राप्त केले आहे. सत्ताबदल घडवून आणण्यासाठी इराण वर युद्ध लादणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अमेरिकेचे नामधारी अध्यक्ष म्हणून काम करण्याची वेळ आली आहे. दुसऱ्याच्या घरावर दगड मारताना आपले घरही काचेचे आहे हे आता त्यांच्या लक्षात आले असेल. जगभरातील टेरिफ ग्रस्त राष्ट्रांसाठी ही आनंदाची घटना आहे.

इराणची खामेनी राजवट न्यूक्लिअर कार्यक्रम अर्थात अण्वस्त्र तयार करत आहे. आणि म्हणून तेथे खामेनी राजवट असता कामा नये. इराणची सूत्रे आपल्या मर्जीतील गटाकडे गेली पाहिजेत किंवा तेथे अमेरिका समर्थक राजवट आली पाहिजे या एकमेव हेतूने डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यांनाहू यांना हाताशी धरून इराणवर हल्ले चढवले. इराण आठ दिवसात शरण येईल आणि तिथे आपण सत्ता बदल घडवू ही त्यांची मानसिकता फलद्रूप झाली नाही. आता त्यांचेच आसन डळमळीत किंवा नामधारी बनलेले आहे.सिनेट आणि प्रतिनिधी गृहात डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाने बहुमत गमावले आहे. विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाने दोन्ही सभागृहात जोरदार मुसंडी मारली आहे. अर्थात बहुमत गमावले असले तरी त्यांचे अध्यक्ष पद अबाधित राहिले आहे. (Tughlaq) पण आता त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे कोणताही निर्णय घेता येणार नाही. कारण त्यांनी घेतलेल्या निर्णयाला दोन्ही सभागृहांची संमती मिळेलच असे नाही. एक प्रकारे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांच्यातील शक्ती काढून घेतली गेली आहे. शक्तिपात झालेले अमेरिकेचे अध्यक्ष अशी आता त्यांची ओळख राहील.
भारत पाकिस्तान सह 11 युद्धे आपणच थांबवली आहेत. असा वारंवार दावा करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना 2025 किंवा 2026 मधील शांततेचे नोबेल पारितोषक हवे होते. त्यासाठी त्यांनी त्यांचे अंकित असलेले राष्ट्र पाकिस्तानकडून नोबेल समितीपर्यंत त्यांच्या नावाची शिफारस करणारा ठराव जाईल अशी व्यवस्था त्यांनी केली होती. डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे ऑपरेशन सिंदूर थांबवले गेलेले नाही. पाकिस्तानी गुडघे टेकल्यामुळे ते थांबवले असा खुलासा भारताने अनेकदा करूनही डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या दाव्यापासून मागे हटले नाहीत. पण त्यांचा हा दावा भारतीय जनतेने कधीही मनावर घेतला नाही.डोनाल्ड ट्रम्प यांचे व्हिसा विषयक धोरण, आर्थिक धोरण, परराष्ट्र धोरण, औद्योगिक धोरण तेथील जनतेला मान्य नव्हते. ट्रम्प यांच्या युद्धखोर भूमिकेमुळे इंधन दर भडकले. बेरोजगारी वाढली. महागाई वाढली. अमेरिकन जनतेचे महिन्याचे बजेट कोलमडले. अकार्यक्षम व्यक्तींची महत्त्वाच्या पदावर निवड केली. तेरीफ कार्डमुळे अमेरिकेचा अनेक राष्ट्रांशी असलेला व्यापार व्यवहार अडचणीत आला. अशा अनेक कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प हे जनतेच्या मनातून उतरत चालले होते. त्याचाच परिणाम म्हणजे मध्यावधी निवडणुकीत ट्रम्प यांचा झालेला पराभव होय.
इसवी सन 2024 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अमेरिकेतील कृष्णवर्णीय तसेच अन्य मतदार डोनाल्ड ट्रम्प यांच्या मागे होते. पण याच मतदारांनी मध्यावधी निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांची जागा दाखवून देण्याचे काम केले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे पंख छाटण्याचे काम मध्यावधी निवडणुकीत तेथील सर्वसामान्य मतदारांनी केले आणि त्याचा आनंद भारतासह अनेक टेरिफ ग्रस्त राष्ट्रांना झालेला आहे. (Tughlaq) सर्वाधिक आनंद इराणच्या सत्ताधाऱ्यांना आणि तेथील जनतेला झालेला आहे. कारण इराण मध्ये सत्ता बदल घडवून आणण्यासाठी ट्रम्प यांनी इराणवर अकारण युद्ध लागले होते आणि आहे. आता त्यांना इराण विषयक निर्णय घेताना दहा वेळा विचार करावा लागेल. कारण युद्ध नको या भूमिकेतून तेथील जनतेने मध्यावधी निवडणुकीत कौल दिला आहे. आणि हा कौल त्यांना मान्य करावाच लागेल.
हेही वाचा :
शेतकऱ्यांना गोड बातमी अखेर आज आणि उद्या 5000 रुपये खात्यात येणार, सरकारची दिवाळी गिफ्ट
दिवाळीच्या एक दिवस आधीच राज ठाकरे यांचा सर्वात मोठा निर्णय, ट्विट करत म्हणाले
निवडणूक हरताच ट्रम्प लाइनवर आले, भारताला दिलासा देणारी मोठी घोषणा