इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध टोकाला पोहोचले. त्यातच आता मोठी माहिती पुढे येत आहे. इराणने कतारकडे युद्धविरामचा प्रस्ताव दिला. यासोबतच त्यांनी स्पष्ट केले की, इराण कोणत्याही प्रकारच्या धमक्या अजिबात सहन करणार नाही.

इराण आणि अमेरिका युद्ध टोक्याला पोहोचले. मोठे हल्ले केले जात होती. यारदरम्यान इराणकडून होर्मुज खाडी बंद करण्यात आली. इराणने कतारकडे युद्धविरामचा प्रस्ताव दिला. इराणकडून आता युद्धविरामचा चेंडू अमेरिकेकडे टाकण्यात आला. इराणने होर्मुज खाडी पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव अमेरिकेकडे दिला. इराणचे म्हणणे आहे की, जर अमेरिकेने आमच्या तीन अटी मान्य केल्या तर पुढील सात दिवसात आम्ही होर्मुज खाडी पुन्हा सुरू करू. (Iran and America) यासोबतच दोन्ही देशात परमाणूच्या मुद्द्यावर पुन्हा चर्चा सुरू होईल. इराणचे विदेश मंत्री अब्बास अराघची यांनी म्हटले की, आता निर्णय अमेरिकेला घ्यावा लागेल. अराघची यांच्या म्हणण्यांनुसार, इराणने हा प्रस्ताव कतारच्या माध्यमातून अमेरिकेकडे दिला आहे. जर आता अमेरिकेने आमचा प्रस्ताव स्वीकारला तर पुढील सात दिवसात आम्ही होर्मुज खाडी सुरू करू.
इराणने त्यांच्या प्रस्तावात मुख्य तीन मागण्या अमेरिकेपुढे ठेवल्या आहेत. इराणी बंदरांबाहेर अमेरिकेच्या नाैसैनेची नाकाबंदी आहे. ती नाकाबंदी तात्काळ हटवली जावी. इराणच्या तेलावर जे काही निर्बंध अमेरिकेने लावली आहेत, ती सर्व निर्बंध त्यांनी हटवावी. एक असा युद्धविराम आम्हाला हवा ज्यात लेबनानचा देखील सहभाग असावा. जर आता अमेरिकेने हा प्रस्ताव मान्य केला तर सात दिवसात होर्मुज खाडी सुरक्षित होईल.(Iran and America) गेल्या काही दिवसांपासून होर्मुज खाडी सुरक्षित करण्यासाठी अमेरिका प्रयत्न करत आहे. मात्र, त्यांना यश मिळत नाही. शेवटी आता होर्मुज खाडी सुरक्षित करण्यासाठी इराणनेच प्रस्ताव दिला. न्यूज एजन्सी रॉयटर्स यांच्या रिपोर्टनुसार, अब्बास अराघच यांनी म्हटले की, आता निर्णय अमेरिकेच्या हातात आहे. यादरम्यानच त्यांनी म्हटले की, इराण दबाव, धमकीसोबत अजिबात सहन करणार नाही. आता सर्वकाही अमेरिकेच्या हातात आहे. सध्या अमेरिकेच्या दाैऱ्यावर चीनचे अध्यक्ष शी. जिनपिंग आहेत. त्यातच इराणकडून युद्धविरामचा प्रस्ताव देण्यात आला. (Iran and America) गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेले युद्ध आता कुठेतरी थांबण्याचे संकेत आहेत. अमेरिका होर्मुज खाडी आमचाच भाग असल्याचा दावा अनेकदा करताना दिसली.
हेही वाचा :
सप्टेंबर महिना संपत आला, ऑगस्टचा हफ्ता कधी जमा होणार? लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट?
सरकारला सदबुद्धी देवो शरद पवारांचा शनिवारी मोर्चा दुष्काळ दौऱ्यापूर्वीच सरकारला घेरणार?
बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी सलग 3 दिवस बँका बंद, कामं आधीच उरकून घ्या?