केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होणार शिंदेंच्या वाट्याला किती मंत्रिपदे येणार?

केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होण्याची शक्यता आहे. या फेरबदलात तीन मंत्रिपदे वाट्याला यावीत, असा एकनाथ शिंदेंचा आग्रह असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच मोठा फेरबदल होणार आहे. येत्या 20 जुलैपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर फेरबदलाबाबत जोरदार चर्चा सुरू आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळातून निर्मला सीतारामन, हरदीप सिंग पुरी, पंकज चौधरी, हर्ष मल्होत्रा यांच्या खात्यात बदल किंवा खाते जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे फेरबदलात शिवसेनेला तीन मंत्रि‍पदे मिळावीत, (ministerial) यासाठी आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षाच्या वाट्याला एक कॅबिनेट आणि दोन केंद्रीय राज्यमंत्रिपद शिवसेनेला मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

कॅबिनेट विस्तार हा केंद्रातील पावसाळी अधिवेशनानंतर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रादेशिक पक्षांना केंद्रीय नेतृत्वाचा वेट एंड वॉचचा सल्ला दिल्याची माहिती मिळतेय. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर ऑगस्टच्या अखेरीस किंवा सप्टेंबरपर्यंत होण्याची शक्यता वर्तवली जातेय. सलग दोन दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी वरिष्ठ नेत्यांच्या बैठका घेत आहेत.(ministerial) त्यात भाजपच्या नव्या कार्यकारिणीतील सदस्यांची नावे निश्चित करून पुढील काही दिवसांमध्ये पक्षाध्यक्ष नितीन नवीन यांच्या नव्या चमूची घोषणा होणार असल्याची माहिती मिळतेय. कार्यकारिणी निवडीनंतर केंद्रीय मंत्रिमंडळातील फेरबदलावर निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांची दिली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्रिमंडळात युवा चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नव्या सामील होणार्‍या मंत्र्‍यांचं सरासरी वय हे 45-46 च्या आसपास असू शकते. तर 65 वर्षांहून अधिक वय असलेल्या नेत्यांना मंत्र्यांना पायउतार व्हाव लागू शकते. काही अपवादा‍त्मक नेतेमंडळी मंत्रिमंडळात कायम राहण्याची शक्यता आहे. याआधी केंद्रीय मंत्रिमंडळात 2 वेळा फेरबदल करण्यात आला होता. (ministerial) त्यानंतर यंदाच्या वेळी मागील वेळी न केलेल्या चेहऱ्यांचा फेरबदलात सामावेश होऊ शकतो. फुटीर खासादारांची देखील मंत्रि‍पदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. आप, ठाकरे, तृणमूल काँग्रेसमधूनही काही खासदारांनी सत्ताधाऱ्यांना साथ दिली आहे. त्यांनाही कॅबिनेटमध्ये जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नव्याने होणार्‍या फेरबदलात पंजाबमधील आपचे खासदार, ठाकरे गटाचे फुटीर खासदार, तृणमूल काँग्रेसचे फुटीर खासदारांपैकी काही जणांना मंत्रिमंडळात समाविष्ट केली जाण्याची मोठी शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :

शिरढोणमध्ये स्मार्ट मीटरवरून महावितरणचे अधिकारी धारेवर?

12वी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी UIDAI मध्ये पदांची भरती सुरु?

रोहित शर्मा रिटायर होणार? टीम इंडियाच्या कोचने दिल उत्तर?