‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाले का? शिंदेंसेनेच्या बड्या नेत्याचा धक्कादायक दावा?

उद्धव ठाकरे यांनी आज पार्लमेंटरी बोर्डाची जी बैठक आयोजित केली होती, त्याबाबत त्यांना आतापर्यंत असे वाटत होते की हे खासदार पुन्हा परत येतील. परंतु, काल संजय राऊत यांनी ज्या प्रकारे त्या खासदारांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य (शिवीगाळ) केली, (meeting) त्याचाच हा परिणाम आहे. त्यामुळेच ते सहाच्या सहाही खासदार आजच्या बैठकीला अनुपस्थित राहिले. याचा थेट अर्थ असा आहे की, त्यांना आता त्या पक्षात राहायचे नाही, हे जवळपास निश्चित झाले आहे, असे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार, मंत्री संजय शिरसाट म्हणाले. आता हे सहा खासदार पुढे काय निर्णय घेतात, यावरच सर्व काही अवलंबून असेल. या प्रक्रियेत जे काही कायदेशीर पेचप्रसंग निर्माण होतील किंवा ज्या काही कारवाईच्या नोटीस दिल्या जातील, त्या सर्वांना हे सहाही खासदार आता एकत्र येऊन लढा देतील, असे मला वाटते, असेही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे नेहमीच असे करतात. शेवटच्या क्षणाला फोन करणे हा त्यांचा स्वभावच आहे. आम्ही जेव्हा उठाव केला होता, त्या वेळी शेवटच्या क्षणाला आम्हालाही ५० ते ६० फोन आले होते. परंतु, आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे.(meeting) त्यामुळे आता त्यांची मनधरणी करण्यात काहीही अर्थ राहिलेला नाही आणि याची जाणीव मला वाटते उद्धव ठाकरे यांना आधीच झाली होती, असेही संजय शिरसाट म्हणाले.

“हे ‘ऑपरेशन टायगर-वायगर’ काय आहे? आम्ही कोणतेही ऑपरेशन केलेले नाही. त्या खासदारांच्या मनात पक्षामध्ये अंतर्गत जी नाराजी होती, ती त्यांनी व्यक्त केली आहे. आता ते आमच्याकडे की इतर कुठे येणार, याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब घेतील. या विषयावर आम्हाला भाष्य करण्याचा अधिकार नाही.” असे संजय शिरसाट स्पष्टपणे म्हणाले.”आता ही त्यांची ठरलेलीच वाक्ये आहेत. यामध्ये आता खोके, पैसे असे सगळे शब्द ते वापरतील; कारण ती त्यांच्या सवयीचाच एक भाग आहे. जर ते खासदार आमच्याकडे आले, तर त्यावर अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार फक्त एकनाथ शिंदे साहेबांनाच आहे आणि त्यावर बोलण्याचा अधिकारही त्यांचाच आहे. (meeting) त्यामुळे शिंदे साहेब यावर काय भूमिका घेतात, याकडे आमचेही लक्ष लागून राहिले आहे,” असेही संजय शिरसाट म्हणाले.

हेही वाचा :

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! मे महिन्याचे 1500 रुपये बँक खाते करा चेक?

जल व्यवस्थापनाचे तीन तेरा पाच दशकांनंतर पाणीबाणी!

स्लोव्हाकियाशी भागीदारी वाढवणार : पंतप्रधान मोदी