नाणेफेक झिम्बाब्वेने जिंकली आणि गोलंदाजी स्वीकारली, श्रेयस एक बदल करत म्हणाला?

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात दुसरा टी20 सामना होत आहे. या सामन्यात भारताने विजय मिळवला तर मालिका 2-0 ने जिंकणार आहे. त्यामुळे या सामन्यातील कामगिरीकडे भारतीय क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.

भारताने आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिका गमावल्यानंतर झिम्बाब्वेत चांगली सुरूवात केली आहे. खरं तर या मालिकेपूर्वी टीम इंडियावर दडपण होतं. कारण आयर्लंडविरुद्धची मालिका 0-2 ने, तर इंग्लंडविरुद्धची मालिका 0-4 ने गमावली होती. (Zimbabwe) त्यामुळे कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं. पण झिम्बाब्वेविरुद्धचा पहिला सामना जिंकला आणि भारतीय क्रीडाप्रेमींचा जीव भांड्यात पडला. आता भारताला मालिका खिशात घालण्याची संधी आहे. कारण तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत भारताने आधीच 1-0 ने आघाडी घेतली आहे. (Zimbabwe) दरम्यान, नाणेफेकीचा कौल हा झिम्बाब्वेच्या बाजूने लागला आणि कर्णधार सिकंदर रझा याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सलग आठ सामन्यानंतर श्रेयस अय्यरने नाणेफेकीचा कौल गमावला आहे.

भारतीय संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला की, ‘आम्ही प्रथम फलंदाजी करणार होतो. खेळपट्टी थोडी वेगळी दिसतेय. ती पहिल्या सामन्याइतकी चिकट नाही. फलंदाजीसाठी ही खेळपट्टी उत्तम असेल याची खात्री करूया. आम्ही हाच संदेश देत आहोत की वर्तमानात राहा, त्या क्षणात राहणे आणि आपल्या क्षमतेनुसार सर्वोत्तम खेळ करणे आवश्यक आहे. आमच्या संघात एक बदल आहे.’ टीम इंडियाने संघात एक बदल करत यश ठाकुरला संधी दिली आहे. पहिल्या सामन्यात अशोक शर्मा खेळला होता. मात्र त्याला काही विकेट घेता आली नाही. (Zimbabwe) त्यामुळे त्याच्या जागी आता यश ठाकुरला जागा दिली आहे.

भारत (प्लेइंग इलेव्हन): वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, रवी बिश्नोई, प्रिन्स यादव, यश ठाकूर, मयंक यादव.

झिम्बाब्वे (प्लेइंग इलेव्हन): ब्रायन बेनेट, बेन कुरान, डायन मायर्स, सिकंदर रझा (कर्णधार), रायन बर्ल, वेस्ली माधेवरे, तादिवानाशे मारुमणी (विकेटकीपर), ब्रॅड इव्हान्स, न्यूमन न्याम्हुरी, रिचर्ड नागारावा, ब्लेसिंग मुझाराबानी.

हेही वाचा :

झिम्बाब्वेविरुद्धचा सामना कुठे पाहता येणार? योग्य माहिती जाणून घ्या?

आमदार नारायण कुचे यांच्या कारचा भीषण अपघात ३ जण गंभीर जखमी?

मग अट्टहास कशासाठी केला?