मुंबई लोकलचं वेळापत्रक कोलमडलं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत!

सीएसएमटी स्टेशनवर लोकल गाड्या रखडल्या आहेत. त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावर लोकांची गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. लवकरत लवकर ही अडचण दूर करावी, अशी मागणी केली जात आहे.

लोकल ही मुंबईची जीवनवाहिनी आहे. ही लोकल एक मिनिट जरी उशिरा आली तर हजारो लोकांना त्यांच्या ऑफिसला पोहोचायला वेळ होतो. त्यामुळेच लोकलचे वेळापत्रक कोलमडणे हे न परवडणारे आहे. दिवसभर लोकल रेल्वे वेळेवर धावाव्यात यासाठी संपूर्ण यंत्रणा दिवसभार काम करत असते परंतु तरीदेखील कुठेतरी अडचण येतेच. आजदेखील मुंबईत मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सीएसएमटी स्टेशनवर लोकल गाड्या रखडल्या आहेत.(Railway) त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावर लोकांची गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. लवकरत लवकर ही अडचण दूर करावी, अशी मागणी केली जात आहे.

नेमका काय बिघड झाला मिळालेल्या माहितीनुसार मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे सीएसएमटीवर लोकल गाड्या रखडल्या आहेत. तब्बल अर्ध्या तासापासून वाहतूक सेवा विस्कळीत झालेली आहे. सीएसएमटीच्या बाहेर सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे ही समस्या जाणवत आहे. मध्य रेल्वेची लोकल सेवा 15 ते 20 मिनिटांनी उशिराने धावत आहे. सिग्नलमध्ये निर्माण झालेला तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी कर्मचारी वेगाने काम करत आहेत.

अर्धा तास होऊनही सीएसएमटीवर लोकल रखडलेल्या असल्याने मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. आता कार्यालये सुटण्याची वेळ झाली आहे. (Railway)त्यामुळे चाकरमानी आपापल्या घरी निघण्यासाठी सीएसएमटी, दादर अशा स्टेशनवर जमा होण्यास सुरुवात होणार आहे. असे असताना सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याने आता चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

दरम्यान, आम्ही सिग्नल यंत्रणेतील बिघाड दूर करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहोत, असे रेल्वे विभागाकडून सांगण्यात आले आहे. तसेच लवकरत लवकर ही समस्य दूर करण्यात येईल.(Railway) त्यामुळे प्रवाशांनी घाबरून जाऊ नये. लोकल 10 ते 15 मिनिटांनी उशिराने धावत आहेत. त्यामुळे प्रवास करताना प्रवाशांनी योग्य काळजी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. पश्चिम मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरळीत आहे. तिथे लोकलच्या वेळापत्रकात बदल झालेला नाही.

हेही वाचा

आता मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीला प्रवेश; मंत्रालयातील गर्दी टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय

हादरवणारी घटना; आंब्याचे आमिष दाखवून अडीच वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

कॅन्सरची सुरूवातीची लक्षणे कोणती?