हातात पाण्याची बाटली अन् पाणी-पाणी करत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली

भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांमध्ये आता युद्धाला सुरवात झाली आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून हल्लयासंबंधितचे अनेक व्हिडिओज सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत. भारत पाकिस्तान युद्ध आता जागतिक चर्चेचा बनला आहे. त्यातच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ माजवत आहे. यात ते सिंधू पाणी(water) करार रद्द झाल्यानंतर पाकिस्तानची खिल्ली उडवताना दिसून आले. हा व्हिडिओ वाऱ्याच्या वेगाने सोशल मीडियावर शेअर केला जात आहे मात्र याची सत्यता पडताळताच एक वेगळे सत्य समोर येत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भारताने सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर पाकिस्तानची खाल्ली उडवत असल्याचा दावा केला आहे. मात्र याचा सखोल तपस केल्यानंतर व्हिडिओचे नवीन सत्य समोर आले आहे. खरंतर, या व्हिडिओचा पाकिस्तान किंवा सिंधू कराराशी काहीही संबंध नाही.

हा व्हिडिओ २०१६ सालचा असून, तो अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणूक प्रचाराच्या काळातला आहे. त्या वेळी डोनाल्ड ट्रम्प रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवारीसाठी स्पर्धा करत होते आणि त्यांच्या विरोधात सिनेटर मार्को रुबियोदेखील रिंगणात होते. ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारसभेत रुबियो यांची थट्टा करताना हा व्हिडिओ तयार केला होता. २०१३ मध्ये मार्को रुबियो यांनी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या स्टेट ऑफ द युनियन भाषणानंतर प्रतिसाद देताना मध्येच पाणी प्यायला घेतले होते. ट्रम्प यांनी याच प्रसंगाची खिल्ली उडवली होती.

व्हायरल व्हिडिओमध्ये ट्रम्प पाण्याची बाटली घेताना, पाणी(water) जमिनीवर शिंपडताना आणि नंतर हसत पाणी पिताना दिसतात. हे दृश्य X (पूर्वीचे ट्विटर), फेसबुक आणि इंस्टाग्रामवर “भारताने सिंधू पाणी करार संपवल्यानंतर ट्रम्पने पाकिस्तानची खिल्ली उडवली” अशा खोट्या दाव्यासह शेअर करण्यात येत आहे. पण रिव्हर्स इमेज सर्च केल्यानंतर आम्हाला सीएनएन आणि सीबीएस न्यूज या प्रतिष्ठित मीडिया संस्थांनी २७ फेब्रुवारी २०१६ रोजी अपलोड केलेले मूळ व्हिडिओ सापडले.

या व्हिडिओमध्ये ट्रम्प टेक्सासमधील फोर्ट वर्थ येथे झालेल्या रॅलीत बोलताना दिसतात. त्यांनी विनोदी शैलीत मार्को रुबियोच्या पाणी पिण्याच्या घटनेची खिल्ली उडवली होती. यावरून स्पष्ट होते की हा व्हिडिओ जुना आहे आणि त्याचा सिंधू करार रद्द होण्याशी काहीही संबंध नाही. अशा प्रकारच्या चुकीच्या पोस्ट सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या आहेत. त्यामुळे अशा दाव्यांवर ठोस पुरावा मिळाल्याशिवाय विश्वास ठेवू नये.

हेही वाचा :

मैत्रिणीनेच केला घात! ड्रग्ज देऊन मित्रांच्या हवाली केले, महिनाभर सामूहिक बलात्कार

दोन पक्षातील फुट भाजपच्या पथ्यावर पडणार; महाविकास आघाडी एकत्र लढण्याची शक्यता

भारत POK च्या 60 किमी आत घुसला अन्…; पाकिस्तानचे 4 पायलट जेरबंद